मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Bigg Boss 17: घरातून बाहेर पडल्यावर निर्णय घेणार! अंकिता लोखंडेने पुन्हा दिले घटस्फोटाचे संकेत

Bigg Boss 17: घरातून बाहेर पडल्यावर निर्णय घेणार! अंकिता लोखंडेने पुन्हा दिले घटस्फोटाचे संकेत

Harshada Bhirvandekar HT Marathi
Jan 03, 2024 12:46 PM IST

Bigg Boss 17 Latest Update: ‘बिग बॉस १७’च्या येत्या एपिसोडमध्ये हे वाद पाहायला मिळणार आहे. विकी जैन पुन्हा एकदा आपल्या पत्नीची म्हणजेच अंकिता लोखंडे हिची खिल्ली उडवताना दिसणार आहे.

Bigg Boss 17 Latest Update
Bigg Boss 17 Latest Update

Bigg Boss 17 Latest Update:बिग बॉस १७’च्या घरात आता विकी जैन आणि अंकिता लोखंडे यांच्यात अनेक वाद होताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांत अंकिता आणि विकी जैन यांच्यात टोकाचे वाद होत आहेत. अंकिता लोखंडेने विकी जैनपासून वेगळं होण्याची धमकी देखील दिली होती. तर, एकदा विकी जैन याने पत्नी अंकिता लोखंडे हिच्यावर हात उचलण्याचा प्रयत्न केला होता. आता पुन्हा एकदा अंकिताने आपण घरातून बाहेर पडल्यावर मोठा निर्णय घेणार असल्याचे म्हटले आहे.

‘बिग बॉस १७’च्या येत्या एपिसोडमध्ये हे वाद पाहायला मिळणार आहे. विकी जैन पुन्हा एकदा आपल्या पत्नीची म्हणजेच अंकिता लोखंडे हिची खिल्ली उडवताना दिसणार आहे. यामुळे अंकिता लोखंडे चांगलीच संतापणार आहे.ईशा मालवीया घरात व्यायाम करत असताना या वादांना सुरुवात होणार आहे. ईशाला व्यायाम करताना पाहून विकी तिला अंकिताबद्दल सांगणार आहे. विकी गंमतीने ईशाला म्हणतो की, अंकिता असा व्यायाम करण्यासाठी आणखी तीन लोकांची मदत घेईल. हे ऐकून अंकिता चांगलीच संतापणार आहे.

Nupur Shikhare: आमिर खानचा होणारा जावई किती शिकलाय? कमाई काय? वाचा...

यावे;इ अंकिता लोखंडे तिच्या वर्कआउट रुटीनबद्दल सांगणार आहे. यावेळी पुन्हा एकदा विकी तिची खिल्ली उडवणार आहे. चिडलेली अंकिता लोखंडे पती विकी जैन याला उशी फेकून मारणार आहे. यावेळीमन्नारा अंकिताचे कौतुक करत म्हणणार आहे की, अंकिता खूप हॉट दिसते. मात्र, विकीने म्हणतो की,त्याला त्याची पत्नी हॉट वाटत नाही. यानंतर तो सारवासारव करत म्हणतो की, अंकिता हॉट नसून क्यूट आहे. यामुळे अंकिताला पुन्हा एकदा राग येणार आहे. यानंतर अंकिता पुन्हा एकदा घटस्फोटाचा विषय काढणार आहे.

या शोमध्ये अंकिता लोखंडे म्हणणार आहे की,'मला माहित आहे,आता मला काय करायचे आहे. आणि या शोमधून बाहेर पडल्यानंतर मी निर्णय घेईन.' मन्नारा अंकिताला विचारणार आहे की, ती कोणत्या निर्णयाबद्दल बोलत आहे? यावर, अंकिता लोखंडे म्हणणार आहे की, वेळ आल्यावर तुम्हा सगळ्यांना कळेलच. आता यावरून अंकिता घटस्फोट घेणार, असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

WhatsApp channel

विभाग