मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Bigg Boss 17: आई-वडिलांचं नाव घेताच सासूवर भडकली अंकिता लोखंडे! असं काय म्हणाली विकी जैनची आई? पाहा…

Bigg Boss 17: आई-वडिलांचं नाव घेताच सासूवर भडकली अंकिता लोखंडे! असं काय म्हणाली विकी जैनची आई? पाहा…

Harshada Bhirvandekar HT Marathi
Jan 09, 2024 02:01 PM IST

Bigg Boss 17 Latest Update: विकी जैनची आई अर्थात सासू घरात आल्यानंतर काही वेळातच अंकिताने तिच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली.

Bigg Boss 17 Latest Update
Bigg Boss 17 Latest Update

Bigg Boss 17 Latest Update: छोट्या पडद्यावरचा लोकप्रिय टीव्ही शो ‘बिग बॉस १७’मध्ये आता फॅमिली वीक सुरू झाला आहे. ‘फॅमिली वीक’च्या पहिल्याच दिवशी विकी जैनची आई, अंकिता लोखंडेची आई आणि अरुण महाशेट्टीची पत्नी यांची बिग बॉसच्या घरात एन्ट्री झाली होती. नुकताच या भागाचा एक प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोनुसार, घरातील सदस्य आल्याचे पाहून सगळे स्पर्धक भावूक झालेले दिसले. त्याचवेळी स्पर्धक मुनव्वर फारुकीच्या डोळ्यात देखील अश्रू तरळले. त्याला देखील त्याच्या आईची आठवण येऊ लागली होती. तर, विकी जैनची आई अर्थात सासू घरात आल्यानंतर काही वेळातच अंकिताने तिच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. या दोघींमध्ये यावेळी चांगलेच वाद झालेले पाहायला मिळाले.

विकीची आई रंजना जैन यांनी ‘बिग बॉस १७’च्या घरात एंट्री घेताच एक शेर म्हटला आहे. 'तुमने ऐसी कला जीने की कहां से सीखी, मैंने समुंदर से सीखा ए जीने का सलीका। चुप-चाप से बहना और अपनी मौज में रहना।', हा शेर विकी जैनच्या आईने सगळ्यांना ऐकवला. त्यांचा हा शेर ऐकून सगळेच हसले. सगळ्यांनी मिळून यावेळी जल्लोष केला. पण, काही वेळातच विकीची आई आणि अंकिता यांच्यात जोरदार वाद सुरू झाला.

Yash Birthday Accident: ‘केजीएफ’ स्टार यशचा वाढदिवस साजरा करणाऱ्या तीन चाहत्यांचा मृत्यू! नेमकं काय घडलं?

आपल्या आई-वडिलांचं नाव घेताच अंकिता लोखंडे अशी संतापली की, तिने लगेचच सासूशी वाद घालण्यास सुरुवात केला. या घरात येताच विकीची आई अंकिताला म्हणाली की, 'ज्या दिवशी तू विकीला लाथ मारलीस. त्या दिवशी मी लगेच तुझ्या आईला फोन करून विचारले की, ‘तू तुझ्या नवऱ्याला अशीच लाथ मारलीस होतीस का?’ सासूचे हे बोलणे ऐकताच अंकिताला खूप राग आला. आपल्या सासूला उत्तर देताना अभिनेत्री म्हणाली की, ‘माझ्या आईला तुम्ही असं विचारायची काय गरज होती? विचार करा तिला किती वेदना झाल्या असतील. माझ्या वडिलांचे निधन झाले आहे, आई. प्लीज माझ्या आईवडिलांविषयी असं काहीहे बोलू नका.’

आई वडिलांचं नाव घेऊन विकीच्या आईने अंकिताला सुनावल्यावर अभिनेत्री चांगलीच संतापलेली पाहायला मिळाली. तिने देखील आपल्या सासूबाईंना त्यांच्याच शब्दांत उत्तर दिले.

WhatsApp channel