Bigg Boss 17 Latest Episode: ‘बिग बॉस १७’ या शोमध्ये आता स्पर्धकांच्या कुटुंबाच्या एन्ट्रीमुळे चांगलीच रंगत आली आहे. विकी जैनची आई नुकतीच ‘बिग बॉस’ या शोमध्ये आली होती. शोमध्ये आल्यानंतर विकीची आई अंकिता लोखंडेशी वाद घालताना दिसली. इतकंच नाही तर, ती अंकिता लोखंडेला वाईटसाईट देखील बोलली. अंकिताला तिच्या सासूच्या बोलण्यातून स्पष्टपणे कळले आहे की, ती तिच्यावर खूप रागावलेली आहे. आता या शोचा एक नवीन प्रोमो समोर आला आहे, ज्यामध्ये अंकिता तिच्या आईशी बोलताना दिसली आहे. तर, दोघीही यावेळी भावूक झालेली पाहायला मिळाली आहे.
यावेळी आईशी बोलताना अंकिता म्हणाली की, ‘विकीच्या आईच्या नजरेत केवळ मीच चुकीची आहे. या गोष्टींचा माझ्यावर खूप परिणाम होत आहे. त्यांच्या मुलाला मी त्रास देते, असे त्यांना वाटत आहे. मी कोणालाही माझ्यासोबत शोमध्ये येण्यासाठी जबरदस्ती केली नव्हती. मी आता अशी कोणती चूक केली की, ज्यामुळे माझे कुटुंबीय माझ्यावर प्रश्न उपस्थित करत आहेत? विकी देखील मला अनेक गोष्टी बोलला आहे.’
आपलं बोलणं पूर्ण झाल्यानंतर अंकिता आईच्या मांडीवर डोके ठेवते आणि रडू लागते. आपल्या मुलीला असे पाहून अभिनेत्रीची आईही भावूक झाली होती. अकीताला पाहून तिची आई म्हणाली की, ‘तू आता त्यांच्या सगळ्या गोष्टी सोडून दे.’ आता अंकिता तिच्या आईचे ऐकून तिचे आणि विकीचे नाते नीट सांभाळण्याचा प्रयत्न करेल की, दोघांमधील दुरावा वाढतच जाईल? हे लवकरच कळणार आहे.
मात्र, अंकिताच्या सासूबाई आणि तिच्यात खूपच बेबनाव पाहायला मिळत आहेत. अंकिताच्या वागण्यावरून विकीच्या आईने थेट तिच्या आईला फोन लावला होता. हीच गोष्ट त्यांनी ‘बिग बॉस १७’च्या घरात देखील बोलून दाखवली होती. मात्र, यावरून अंकिता खूपच संतापली होती. यावरून दोघींमध्ये बाचाबाची झालेली देखील पाहायला मिळाली. आता दोघींमधील हे वाद सोशल मीडियावर देखील गाजत आहेत.