Bigg Boss 17 Latest Episode: प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन हे 'बिग बॉस १७'मध्ये स्पर्धक म्हणून सामील झाले आहेत. एरव्ही रोमँटिक दिसणारी ही जोडी या घरात मात्र एकमेकांशी कडाक्याची भांडणं करताना दिसत आहेत. अनेकदा घरात जोरदार वाद होत आहे. यात अंकिता आणि विकी यांच्यात जास्त वाद होताना दिसत आहेत. दोघांमधील वाद पाहून आता चाहते देखील अवाक् झाले आहेत. आता या घरात आलेल्या अंकिताने एक मोठा खुलासा केला आहे. अंकिता म्हणाली की, 'चार महिने एकमेकांसोबत एकत्र राहून व्हेकेशन एन्जॉय करू, असा विचार करून आम्ही दोघे या घरात आलो होतो. कारण आम्ही एकत्र राहत नाही.'
अंकिता लोखंडे हिने केलेल्या या व्यक्तव्यामुळे आता सगळ्यांनाचा धक्का बसला आहे. अंकिता लोखंडे हिने 'बिग बॉस १७'च्या घरात जाण्यापूर्वी एक मुलखात दिली होती. या मुलाखतीत तिने आपण पतीसोबत एकत्र राहत नसल्याचा खुलासा केला होता. यावेळी अंकिता म्हणाली होती की, 'आम्ही चार महिने एकमेकांसोबत एकत्र राहू शकू आणि आमच्यासाठी हा व्हेकेशन टाईम असेल, असंच समजून आम्ही या घरात आलो आहोत. कारण आम्ही असे घरात एकत्र राहत नाही. मी मुंबईत राहते. तर, विकीचा बिझनेस विलासपूरमध्ये असल्याने तो तिथे राहतो.'
पुढे अंकिता म्हणाली की, 'विकी कामात असला तरी वेळ काढून मुंबईत येतो. तेच काही दिवस आम्ही एकत्र असतो. नाहीतर बाकी दिवस आम्ही एकमेकांपासून वेगळे राहतो. आमच्यात जेव्हा भांडण होतं तेव्हा विकी सगळ्यात आधी आणि जास्त चिडतो. पण तितकीच लगेच त्याची समजूत काढता येते.' मात्र, सध्या घरात वेगळंच चित्र दिसत आहे.
'बिग बॉस १७'च्या मंचावर प्रथमच अंकिता लोखंडेचे खरे व्यक्तिमत्त्व चाहत्यांना पाहायला मिळाले आहे. यावेळी अभिनेत्रीला पसंती मिळण्याऐवजी ती प्रेक्षकांच्या मनात व्हिलन ठरत चालली आहे. तर, दुसरीकडे ती ट्रोल देखील होत आहे. सतत विकी आणि अंकिताची भांडणं पाहून आता प्रेक्षक देखील वैतागले आहेत. कधी कधी विकीच्या वागणुकीमुळे अंकिताचे चाहते त्यांच्यावर चांगलेच संतापले आहेत.
संबंधित बातम्या