छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय शो म्हणून 'बिग बॉस' पाहिला जातो. बॉलिवूडचा भाईजान सलमान खान सूत्रसंचालन करत असलेल्या बिग बॉसचे १७वे पर्व हे चर्चेत आहे. यंदा कोणता स्पर्धक जिंकणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. थोड्याच वेळात या शोचा विजेता घोषित केला जाणार आहे. पण हा शो कुठे आणि कसा पाहायला येणार असा प्रश्न सर्वांना पडला आहे...
बिग बॉस १७ चा ग्रँड फिनाले तुम्ही आज संध्याकाळी सहापासून कलर्स टीव्हीवर पाहू शकता. याशिवाय जिओ सिनेमा या अॅपवरही तुम्हाला पाहता येणार आहे. जिओ सिनेमावर नि:शुल्क तुम्हाला हा फिनाले पाहता येईल. या शो ला सलमान खान होस्ट करणार आहे. त्याच बरोबर भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया हे को- होस्ट असणार आहेत.
वाचा: श्रेयस तळपदेची आत्या आहे 'ही' बॉलिवूड अभिनेत्री
बिग बॉस १७ चा ग्रँड फिनालेमध्ये नेहमीच काही कलाकार पाहुणे म्हणून हजर असतात. यावेळी माधुरी दीक्षित, सुनील शेट्टी, ऑरीसोबत आणखी कलाकार हजेरी लावणार असल्याचे म्हटले जात आहे. हा शो जवळपास सात तास चालणार आहे. रात्री १२ वाजता शोचा विजेता घोषित केला जाणार आहे.
'बिग बॉस'चे एक फॅन पेज आहे. या पेजने 'बिग बॉस १७'मधील विजेत्याचे नाव सोशल मीडियावर शेअर केले आहे. या पेजने दिलेल्या माहितीनुसार, अंकिता लोखंडे (Ankita Lokhande), विकी जैन (Vicky Jain) मनारा चोप्रा (Mannara Chopra) 'बिग बॉस 17'चे विजेते होणार नसून मुनव्वर फारुकी (Munawar Faruqui) या कार्यक्रमाचा विजेता होईल. 'बिग बॉस १७'च्या विजेत्यासंदर्भात अनेक ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यात मिळालेल्या माहितीनुसार २८ जानेवारी २०२४ रोजी मुनव्वर फारुकी 'बिग बॉस १७'च्या ट्रॉफीवर नाव कोरणार आहे.
'बिग बॉस १७'च्या विजेत्याला एक ट्रॉफी, आलिशान कार आणि ५० लाख रुपयांचे रोख बक्षिस मिळणार आहे. या बक्षिसाने एखाद्या स्पर्धकाचे संपूर्ण आयुष्य बदलणार आहे. त्यामुळे कोणता स्पर्धक ट्रॉफीवर त्याचे नाव कोरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.