Bigg Boss 17 Grand Finale Live Updates: छोट्या पडद्यावरच लोकप्रिय, परंतु नेहमीच वादग्रस्त ठरलेला ‘बिग बॉस’चा यंदाचा सीझन म्हणजेच ‘बिग बॉस १७’ आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ‘बिग बॉस १७’चा महाअंतिम सोहळा पार पडणार असून, त्याची तयारी देखील सुरू झाली आहे. या घरात एकूण २१ स्पर्धक सामील झाले होते. यापैकी आता केवळ ५ स्पर्धक शिल्लक राहिले आहेत. याच पाच स्पर्धकांमध्ये विजेतेपदाची चुरस रंगणार आहे. आता ‘बिग बॉस १७’चा ग्रँड फिनाले कधी आणि कुठे पाहता येणार? हे जाणून घेऊया...
मुनव्वर फारुकी, अभिषेक कुमार, अंकिता लोखंडे, मन्नारा चोप्रा आणि अरुण महाशेट्टी यांच्यापैकी ‘बिग बॉस १७’ ची ट्रॉफी आणि बक्षिसाची रक्कम कोण पटकावेल, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. या प्रश्नाचे उत्तर लवकरच प्रेक्षकांना मिळणार आहे. ‘बिग बॉस १७’चा ग्रँड फिनाले रविवारी प्रसारित होणार आहे. आता हा सोहळा किती वाजता आणि कुठे पाहता येणार, हे जाणून घेण्यासाठी देखील सगळे उत्सुक आहेत.
टीव्हीचा सर्वात मोठ्या रिअॅलिटी शो ‘बिग बॉस १७’च्या घरामध्ये काही महिन्यांपूर्वी मनोरंजन विश्वातील काही कलाकारांना मूलभूत सामानसह घरात बंद करण्यात आले होते. आताया सीझनचा विजेता कोण होणार? हे जाणून घेण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. वादविवाद आणि अनेक लढतीनंतर ५ अंतिम स्पर्धकांमधून विजेता निवडण्याची वेळ आता आली आहे. २८ जानेवारी रोजी संध्याकाळी ६ ते १२ या वेळेत ग्रँड फिनालेचा भाग प्रसारित होणार आहे. ‘बिग बॉस १७’चा ग्रँड फिनालेचा हा एपिसोड एकूण ६ तास टेलिकास्ट होणार आहे.
‘बिग बॉस १७’च्या ग्रँड फिनालेची तारीख आणि वेळ जाणून घेतल्यानंतर, आता हा शो कुठे पाहता येईल हे जाणून घेऊया. कलर्स टीव्हीवर ‘बिग बॉस १७’चा ग्रँड फिनाले एपिसोड पाहता येणार आहे. याशिवाय तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमध्ये जिओ अॅप्लिकेशन इन्स्टॉल करून या रिअॅलिटी शोचा अंतिम सामना पाहण्याचा आनंद घेऊ शकता. ‘बिग बॉस १७’चा ग्रँड फिनाले पाहण्यासाठी तुम्ही तुमच्या फोनवर ‘जिओ सिनेमा’ अॅप इंस्टॉल करा आणि 'Bigg Boss 17' Live वर क्लिक करा. या ठिकाणी तुम्ही ‘बिग बॉस १७’चा ग्रँड फिनाले बघू शकता.