Bigg Boss 17: 'बिग बॉस १७'च्या पहिल्याच एलिमिनेशनमध्ये आला मोठा ट्विस्ट! स्पर्धकांना लागणार झटका
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Bigg Boss 17: 'बिग बॉस १७'च्या पहिल्याच एलिमिनेशनमध्ये आला मोठा ट्विस्ट! स्पर्धकांना लागणार झटका

Bigg Boss 17: 'बिग बॉस १७'च्या पहिल्याच एलिमिनेशनमध्ये आला मोठा ट्विस्ट! स्पर्धकांना लागणार झटका

Published Oct 23, 2023 11:02 AM IST

Bigg Boss 17 First Week Elimination: 'बिग बॉस १७'च्या नवरात्रीच्या स्पेशल एपिसोडमध्ये काही पाहुण्यांनी या शोमध्ये हजेरी लावली होती.

Bigg Boss 17 First Week Elimination
Bigg Boss 17 First Week Elimination

Bigg Boss 17 First Week Elimination: 'बिग बॉस'च्या १७व्या सीझनमध्ये प्रेक्षकांना धमाके पाहायला मिळत आहेत. आता बिग बॉसच्या नवरात्री उत्साहात साजरी केली जात आहे. नुकताच 'वीकेंड का वार' भाग पार पडला. 'वीकेंड का वार'मध्ये होस्ट सलमान खानने सर्व घरातील स्पर्धकांसोबत हा सण साजरा केला. यावेळी एलिमिनेशन संदर्भात एक ट्विस्ट आणून त्याने स्पर्धकांना धक्का देखील दिला. 'बिग बॉस १७'मध्ये पहिल्या आठवड्यात तीन स्पर्धक नॉमिनेट झाले होते. यात मन्नारा चोप्रा, नाविद आणि अभिषेक कुमार यांना पहिल्या आठवड्यात घराबाहेर काढण्यासाठी नॉमिनेट करण्यात आले होते. त्यापैकी एक शोच्या पहिल्या आठवड्यात बेघर होणार होते. मात्र, आयत्यावेळी सलमान खानने यात ट्विस्ट आणला.

'बिग बॉस १७'च्या नवरात्रीच्या स्पेशल एपिसोडमध्ये काही पाहुण्यांनी या शोमध्ये हजेरी लावली होती. यामध्ये कंगना रनौत, गिप्पी ग्रेवाल, कनिका मान आणि विशाल आदित्य सिंह यांनी खास उपस्थिती दर्शवली होती. यावेळी सलमान खानने पाहुण्यांसोबत खूप धमाल केली. एलिमिनेशनमध्ये सलमान खानने पुन्हा एकदा स्पर्धकांसोबत मस्ती केली. यावेळी त्याने अभिषेकला सुरक्षित असल्याचे सांगत मन्नारा आणि नाविद यांना बेघर होण्यासाठी तयार राहण्यास सांगितले. यानंतर अधिक मते मिळवून मन्नारा सुरक्षित असल्याचे जाहीर केले. तर, नाविदला घराबाहेर येण्याचे आदेश दिले. मात्र, नंतर त्याने या आठवड्यात कोणतेही एलिमिनेशन होणार नाही, अशी घोषणा केली.

स्पर्धकांशी थट्टा करत अखेर सलमान खानने सर्व स्पर्धकांना सांगितले की, या आठवड्यात बिग बॉस १७मध्ये नवरात्रीचा उत्सव साजरा केला जात आहे. अशा परिस्थितीत कोणालाही घरातून बाहेर काढले जाणार नाही. सलमानची ही घोषणा ऐकून सगळेच खूप खुश झाले होते. 'बिग बॉस १७'मध्ये एकूण १७ सेलिब्रिटी सहभागी झाले आहेत. अभिषेक कुमार, मन्नारा चोप्रा, नाविद सोले, मुनव्वर फारुकी, अंकिता लोखंडे, विकी जैन, ऐश्वर्या शर्मा, नील भट्ट, ईशा मालवीय, सना रईस खान, सोनिया बन्सल, अनुराग डोवाल (यूके ०७ रायडर), जिग्ना व्होरा, फिरोझा खान, सनी आर्या, रिंकू धवन आणि अरुण श्रीकांत मशेट्टी हे स्पर्धक सहभागी झाले आहेत.

Whats_app_banner