मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  TMKOC: ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये ‘दया भाभी’ साकारणार बिग बॉस १७ची अभिनेत्री? चर्चांना उधाण!

TMKOC: ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये ‘दया भाभी’ साकारणार बिग बॉस १७ची अभिनेत्री? चर्चांना उधाण!

Jan 18, 2024 04:05 PM IST

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Daya Bhabhi: ‘दया बेन’ कधी परतून येणार असा प्रश्न गेल्या कित्येक वर्षांपासून सगळ्यांनाच पडला आहे. या भूमिकेसाठी ‘बिग बॉस १७’ फेम अभिनेत्रीची वर्णी लागण्याची शक्यता आहे.

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Daya Bhabhi
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Daya Bhabhi

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Daya Bhabhi: छोट्या पडद्यावर गेल्या १५ वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा शो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ सध्या त्यांच्या शोमधील ‘दया बेन’ या पात्राची आतुरतेने वाट बघत आहे. प्रेक्षकांना ‘दया बेन’ कधी परतून येणार असा प्रश्न गेल्या कित्येक वर्षांपासून सतावत आहे. आता या भूमिकेसाठी ‘बिग बॉस १७’ फेम अभिनेत्रीची वर्णी लागण्याची शक्यता आहे. ‘बिग बॉस १७’ची ही अभिनेत्री ऐश्वर्या शर्मा असून, तीच नाव दया बेन या पत्रासाठी समोर येत आहे.

‘बिग बॉस १७’ मधून बाहेर पडल्यानंतरही ऐश्वर्या शर्मा अजूनही चर्चेत आहे. ऐश्वर्या शर्मा एक उत्तम मिमिक्री कलाकार आहे, हे देखील सगळ्यांनाच माहित आहे. बिग बॉसमध्येही तिने आपलं मिमिक्री टॅलेंट अनेकदा दाखवलं आहे. आता ऐश्वर्याने ‘दया बेन’ या पात्राची नक्कल केली आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. नुकतीच ऐश्वर्या शर्मा लाईव्ह आली आणि यादरम्यान तिने चाहत्यांच्या अनेक प्रश्नांना उत्तरे दिली.

Tharala Tar Mag 18th Jan: महिपत विरोधात साक्ष देण्यासाठी येणार एका महत्त्वाची व्यक्ती! गुन्हेगाराला शिक्षा होणार?

यावेळी एका चाहत्याने तिला दया बेनची नक्कल करण्यास सांगितले. अभिनेत्रीने चाहत्यांची मागणी पूर्ण केली आणि त्यानंतर ऐश्वर्याने दया बेनची मिमिक्री करून दाखवली. तिची भन्नाट मिमिक्री पाहून चाहते देखील खूप प्रभावित झाले. आता या मालिकेत ‘दया बेन’चे पात्र ऐश्वर्या शर्मा नक्कीच साकारू शकते, असे चाहत्यांनी म्हटले आहे. यानंतर चाहते तिला या पात्रासाठी ऑडिशन देण्याची विनंती करत आहेत. आता चाहत्यांची मागणी ऐकून शोचे निर्माते ऐश्वर्याला ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये दया बेन बनण्याची संधी देणार का? असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेचे निर्माते दया बेनच्या पात्रासाठी नव्या अभिनेत्रीच्या शोधात आहेत. अभिनेत्री दिशा वाकाणी ‘दया बेन’च्या भूमिकेत परतणार नसल्याचे निश्चित झाले आहे. निर्माते या व्यक्तिरेखेसाठी आता नवीन चेहऱ्याच्या शोधात आहेत. तर, आता ऐश्वर्याने हे पात्र साकारावे असे चाहत्यांना वाटत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

अभिनेत्री ऐश्वर्या शर्मा नुकतीच ‘बिग बॉस १७’ या शोमधून बाहेर पडली आहे. यामुळे तिच्या चाहत्यांची निराशा झाली आहे. तिला अचानक घरातून बाहेर काढणे अतिशय चुकीचे असल्याचे सगळ्यांचे म्हणणे आहे. ऐश्वर्याला शोमध्ये परत एन्ट्री मिळावी, अशी मागणी चाहते करत आहेत. मात्र, आता हे घडणे कठीण आहे. ‘बिग बॉस १७’ या शोचा फिनाले आता जवळ येत आहे, त्यामुळे आता वाईल्ड कार्ड एन्ट्री होणे कठीण आहे. ‘बिग बॉस १७’मध्ये तर ऐश्वर्या परतणार नाही. मात्र, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये तिला संधी मिळणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

WhatsApp channel