छोट्या पडद्यावरील रिअॅलिटी शो 'बिग बॉस १७' सुरु होऊन दोन आठवडेच सुरु झाले आहेत. मात्र हा शो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. शोमध्ये स्पर्धकांमध्ये सतत भांडणे होताना दिसत आहेत. तसेच ते एकमेकांविषयी बोलताना दिसत आहेत. अशातच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शोमधील एका स्पर्धकाला झोपेच्या गोळ्या देताना दिल्याचा दावा करण्यात आला आहे.
बिग बॉस १७च्या घरात यूके राइडर अनुराग डोभाल काही खास करताना दिसत नाही. तो अनेकदा घरात झोपताना दिसत आहे. त्यामुळे आता सोशल मीडियावर दावा केला जात आहे की अनुराग डोभालला शोचे निर्माते झोपेच्या गोळ्या देत आहेत. तसेच घरात पक्षपात होताना दिसत आहे.
वाचा: १७ व्या वर्षी प्रेम, लग्न अन् पंचवीशीत घटस्फोट; शाही कुटुंबातील आदितीने लपवले लग्नाचे सत्य
सोशल मीडियावर एक ट्वीट व्हायरल झाले आहे. या ट्वीटमध्ये यूके राइडर अनुराग डोभालचा झोपतानाचे काही फोटो शेअर करण्यात आले आहेत. हे फोटो शेअर करत, टीव्ही कलाकारांमध्ये भेदभाव करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं या फोटोमध्ये स्पष्ट दिसत आहे. बिग बॉस अनुराग डोवाल याला झोपेच्या गोळ्या देत आहेत, जेणेकरून तो दिवसभर झोपू शकेल…' असे म्हटले आहे. हे ट्विट व्हायरल झाल्यानंतर, अभिनेता आणि शोचा होस्ट सलमान खान याने ‘वीकेंड का वार’चा स्क्रिन शॉट सर्वांना दाखवला. ट्वीट पाहिल्यानंतर अनुराग याच्यासोबत अन्य स्पर्धकांना शोमध्ये आमच्यासोबत असे काहीही होत नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.
या वीकेंडच्या वारमध्ये स्पर्धकांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. बिग बॉसच्या घरात आमच्यासोबत कोणताही गैरव्यवहार होत नसल्याचं सर्व स्पर्धकांनी सांगितले आहे.
संबंधित बातम्या