Bigg Boss17 Ankita Lokhande: ‘बिग बॉस १७’च्या घरात आता वातावरण चांगलंच तापलेलं दिसत आहे. ‘बिग बॉस १७’च्या घरात सामील झालेली जोडी अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन यांच्या नात्यात आता मोठे तेढ निर्माण झाले आहेत. बिग बॉसच्या घरात जाण्यापूर्वी ही जोडी नेहमीच एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेली दिसायची. मात्र, या घरात आल्यापासून त्यांच्या नात्याची एक वेगळी बाजू आता प्रेक्षकांना पाहायला मिळाली आहे. आता या घरातून बाहेर पडण्यापूर्वीच हे दोघे घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. यातच आता अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने आपल्या पतीला अल्टीमेटम दिला आहे.
नुकताच बिग बॉस १७चा एक नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये अंकिता लोखंडे पती विकी जैन याला ‘मी तुझ्या आयुष्यातून निघून चालले आहे’ असे म्हणताना दिसली आहे. या घरात रोजच विकी आणि अंकिता यांच्यामध्ये कडाक्याची भांडणं होताना पाहायला मिळत आहेत. मात्र या वादात अनेकांनी अंकिताची बाजू उचलून धरली आहे. दुसरीकडे आता स्वतः अंकिता देखील विकी जैन याच्या वागण्याला कंटाळलेली दिसत आहे. ती लवकरच विकीपासून विभक्त होऊ शकते, असे देखील म्हटले जात आहे. या दोघांमधील वादांनी आता अनेक मर्यादा ओलांडल्या आहेत.
या नव्या प्रोमो व्हिडीओमध्ये अंकिता लोखंडे सोफ्यावर बसलेली असताना तिच्या बाजूला विकी येऊन बसलेला दिसला आहे. यावेळी विकी अंकिताशी बोलण्याचा प्रयत्न करतो. मात्र, अंकिता विकीशी बोलणं टाळते. यावर विकी तिला ‘मी काय केलंय आता?’ असा प्रश्न करतो. तर अंकिता देखील त्याला उत्तर देऊन तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करताना दिसते. मात्र, या दरम्यान देखील दोघांमध्ये तूतू-मैंमैं सुरू होते. यानंतर अंकिता विकिला स्वतःची भांडी घासण्यास सांगते. यावर विकी अंकिताशी वाद घालू लागतो. तर, 'तू स्वतः कॅप्टन बनण्याचा प्रयत्न करू नकोस’, असे विकी अंकिताला म्हणतो.
विकीचं हे बोलणं ऐकून आता अंकिता लोखंडे देखील संतापली आहे. ती आता विकीला म्हणते की, ‘तू तुझी कामं पूर्ण कर. मी तुला सांगणारी कोण आहे ना? तुझ्या भांड्यांमुळे इतरांना त्रास होऊ नये. माहित नाही आजकाल तू असा का वागत आहे. तुला काय झालंय तेच कळत नाही. मी तुझ्या आयुष्यातून निघून चालले आहे.’ असं बोलून अंकिता निघून जाताना दिसणार आहे. अंकिताच्या या वक्तव्यामुळे आता तिच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आले आहे.
संबंधित बातम्या