मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Video: शिवनं पुन्हा जिंकली भारतीयांची मनं! निमृतसाठी केलेल्या त्या कृतीचे चाहत्यांनी केले कौतुक
शिव ठाकरे
शिव ठाकरे (HT)

Video: शिवनं पुन्हा जिंकली भारतीयांची मनं! निमृतसाठी केलेल्या त्या कृतीचे चाहत्यांनी केले कौतुक

25 January 2023, 11:52 ISTAarti Vilas Borade

Shiv Thakare: शिवने निम्रितसाठी केलेले ते कृत्य वीणासोबत देखील झाले होते. तेव्हा देखील शिवने सर्वांची मने जिंकली होती.

बिग बॉस मराठीचा विजेता शिव ठाकरे हा सध्या हिंदी बिग १६मध्ये सहभागी झाला आहे. पहिल्या दिवसापासूनच शिव प्रेक्षकांची मने जिंकत आहे. घरातील इतर स्पर्धकांसोबतचे वागणे, बिग बॉसच्या घराशी संबंधीत घेतलेला प्रत्येक निर्णयाने शिवने सर्वांची मने जिंकली आहेत. सध्या सोशल मीडियावर शिव ठाकरेचा बिग बॉसच्या घरातील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून सर्वांनी शिवचे कौतुक केले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ हा शिवच्या एका चाहत्याने शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये निमृत, सुंबूल आणि एमसी स्टँड हे गार्डव एरिआमधील डग हाऊसमध्ये बसलेले दिसत आहेत. त्यावेळी निमृतने शॉर्ट कपडे परिधान केले आहेत. या कपड्यांमध्ये तिला खाली बसताना कंम्फर्टेबल वाटत नाही. शिवच्या हे लक्षात येते. शिव निमृतला प्रोटेक्ट करण्यासाठी एमसी स्टँडच्या शेजारी असलेली उशी दिली आहे. शिवचे हे कृत्य पाहून नेटकऱ्यांनी कौतुक केले आहे.
वाचा: कंगना रणौतची ट्विटरवर वापसी, पाहा काय आहे पहिले ट्वीट

शिवचे बिग बॉसच्या घरातील जवळपास सर्वांशीच चांगले आहे. निमृत आणि एमसी स्टँड तर त्याचे चांगले मित्रमैत्रिण आहेत. शिव निमृतची सतत काळजी घेत असतो. प्रत्येक टास्कमध्ये ते दोघे एकत्र येऊन परफॉर्म करत असतात. नुकत्याच टेलिकास्ट झालेल्या एपिसोडमधील त्याचे कृत्य पाहून संपूर्ण देशात त्याचे कौतुक केले जात आहे.

विभाग