Bigg Boss 16, Sajid Khan: ‘बिग बॉस’ म्हटलं की सगळ्याच गोष्टी अगदी अनाकलनीय असतात. या शोमध्ये कधी काय घडेल, याचा अंदाज लावता येत नाही. यंदा ‘बिग बॉस’चा १६वा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या वेळी ‘बिग बॉस १६’ एकूण १०० दिवसांहून अधिक काळ लांबवण्यात आला आहे. १०७व्या दिवशी देखील या घरात अनेक स्पर्धक दिसत आहेत. मात्र, आता या घरात स्पर्धा दिसणार आहे. एकापाठोपाठ एक असे दोन तगडे स्पर्धक या खेळातून बाहेर पडले आहेत. या आठवड्यात अब्दू रोजिक पुन्हा घराबाहेर आला. हा धक्का प्रेक्षक पचवतच होते की, दुसऱ्या दिवशी साजिद खान देखील ‘बिग बॉस १६’मधून बाहेर पडला.
‘वीकेंड का वार’मध्ये सलमान खानने निमृत आणि सुम्बुल यांना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांशी कसे वागावे याचे धडे दिले. त्यानंतर ‘बिग बॉसचा जावई’ म्हटल्या जाणाऱ्या साजिद खानला या शोमधून बाहेर काढण्यात आले. इतके दिवस घरात राहिल्यानंतर, अनेक वेळा नॉमिनेट होऊनही कधीही बाहेर न पडलेल्या सदस्याला अचानक बिग बॉसने घराबाहेर काढण्याचे आदेश दिले. त्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्य वाटत होते. तर, ‘बिग बॉस १६’च्या घरातून साजिद खान बाहेर पडल्याने आता ‘मंडली’ गटातील लोकं कमी झाली आहेत.
घरातून बाहेर पडताना साजिद खानने घरातील त्याच्या प्रवासात त्याला साथ दिल्याबद्दल बिग बॉस आणि सर्व स्पर्धकांचे आभार मानले. यावेळी साजिदला देखील अश्रू अनावर झाले. त्याने हात जोडले आणि घरातील सदस्यांना म्हणाला की, 'मी तुम्हा सर्वांची हात जोडून माफी मागतो, ज्यांच्याशी माझे भांडण झाले. आपल्या सहकार्याबद्दल आपले आभार.’
जेव्हा साजिद घरातून बाहेर जायला लागला, तेव्हा साजिदचे 'मंडली' मित्र त्याच्याकडे आले आणि सगळे एकमेकांना घट्ट मिठी मारून रडू लाग्गले. एकाच आठवड्यात, घरात तीन मोठे एलिमिनेशन झाले आहेत, ज्यामुळे सर्वांना धक्का बसला आहे. या स्पर्धेतून तीन तगडे खेळाडू बाहेर झाल्याने प्रेक्षकांमध्ये काहीशी निराशा निर्माण झाली आहे.