Bigg Boss 16 Latest Update: ‘बिग बॉस १६’च्या महाअंतिम सोहळ्याला आता काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. आता या खेळाचे शेवटचे काहीच दिवस शिल्लक राहिले असताना निम्रत कौर अहलुवालिया या शोमधून बाहेर पडली आहे. फिनालेच्या अगदी जवळ पोहोचल्यानंतर बाहेर पडलेल्या निम्रतला मोठा धक्का बसला आहे. या घरातून बाहेर पडल्यानंतर निम्रत कौर अहलुवालियाने मीडियाशी संवाद साधला. यावेळी तिने आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे.
मीडियाशी संवाद साधताना निम्रत कौर अहलुवालियाला रडू कोसळले होते. यावेळी तिने आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.यावेळी तिने घरातील इतर स्पर्धकांशी असलेल्या नात्याबद्दल देखील भाष्य केले आहे. फॅमिली वीकमध्ये निम्रतने आपल्या वडिलांशी केलेल्या वर्तनाबद्दल देखील सगळ्यांसमोर माफी मागितली. नॅशनल टेलिव्हिजनवर वडिलांसोबत गैरवर्तन केल्याबद्दल निम्रतला सलमान खानने तिला फटकारले होते. या घटनेचाही उल्लेख तिने केला. यावेळी सगळ्या आठवणी सांगताना ती ढसाढसा रडली.
निम्रतला प्रेक्षकांच्या थेट मतांच्या आधारे या शोमधून बाहेर काढण्यात आले आहे. या शोमध्ये शिव आणि एमसी स्टॅनसोबत निम्रतची छान मैत्री होती. मात्र, प्रियांकासोबत तिची बॉन्डिंग कधीच पाहायला मिळाली नाही. एमसी स्टॅन आणि शिव ठाकरे यांना ‘टॉप २’मध्ये पाहण्याची इच्छा निम्रतने व्यक्त केली आहे. शेवटच्या दिवशी तिच्या मित्रांपैकीच एकाने सलमान खानच्या शेजारी उभे राहून ट्रॉफी स्वीकारावी, अशी तिची इच्छा असल्याचे तिने सांगितले. दोघांपैकी एकाला जिंकावे, असे तिला मनपासून वाटत आहे.
निम्रत कौर अहलुवालिया घराबाहेर पडल्यानंतर आता ‘बिग बॉस १६’मध्ये शिव ठाकरे, अर्चना गौतम, प्रियांका चौधरी, एमसी स्टॅन आणि शालीन भानोत हे स्पर्धक टिकून रहिले आहेत. ‘बिग बॉस १६’चा ग्रँड फिनाले लवकरच पार पडणार आहे.