Hina Khan Cancer Battle : छोट्या पडद्यावरचा लोकप्रिय शो 'बिग बॉस ११' जिंकणारी आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है'मध्ये ‘अक्षरा बहू’ची भूमिका साकारणारी अभिनेत्री हिना खान हीने एक अतिशय भावूक फोटो शेअर केला आहे. सध्या हिना स्टेज ३ ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देत आहे. ती रोज उठते, स्वतःची काळजी घेते आणि कॅन्सरशी अतिशय धिटाईने लढते. इतकंच नाही तर, ती इतर कॅन्सर पेशंटना लढण्याचं धाडसही देते. यावेळीही तिने असेच काही केले आहे.
आता स्वतः हिना खानने तिच्या सोशल मीडियावर तिची सद्यस्थिती दाखवली आहे. अभिनेत्रीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवरून तिचे २ नवे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो थेट रुग्णालयातील आहेत. हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये हिना खान ज्या अवस्थेत दिसत आहे, ते पाहून चाहत्यांची चिंता आणखी वाढली आहे. हिना खानला या गंभीर अवस्थेत पाहून चाहत्यांचेही ह्रदय कोलमडून गेले आहे. अभिनेत्री ज्या पद्धतीने चालत आहे, ते पाहून सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी आले आहे.
हिनाने सोशल मीडियावर आपला एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत हिना हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये उभी दिसत आहे. त्याच्या एका हातात लघवीची पिशवी आणि दुसऱ्या हातात रक्ताची पिशवी (फोटोवरून अंदाज) दिसत आहे. हा फोटो पोस्ट करताना हिना लिहिते, ‘प्रकाशाच्या दिशेने माझी पावले आणि मी या कॉरिडॉरमधून आयुष्य सावरण्यासाठी चालत आहेत... एका वेळी एक पाऊल.’ हिनाच्या या पोस्टमुळे तिचे चाहते भावूक झाले आहेत. लोक तिच्यासाठी प्रार्थना करत आहेत आणि तिला धीर देत आहेत.
कॅन्सरमुळे झालेली केस गळती लपवण्यासाठी डोक्यावर कपडा बांधलेली आणि हॉस्पिटलचा गणवेश घातलेली हिना खान हातात लघवी आणि रक्त घेऊन चालताना दिसत आहे. अभिनेत्रीच्या एका हातात लघवीची पिशवी आहे आणि दुसऱ्या हातात तिचा रक्ताची पिशवी दिसत आहे. अभिनेत्रीने उपचारादरम्यानचे स्वतःचे हे फोटो शेअर केले आहेत.
चाहते हिनाच्या पोस्टवर कमेंट करत तिचे कौतुक करत आहेत. एक जण म्हणाला, ‘माझं मन खूप दु:खी झालं आहे. काळजी करू नकोस, मला खात्री आहे की, तु नक्की पुनरागमन करशील. माझी कणखर मुलगी.’ दुसरा एकजण म्हणाला, ‘तुम्ही लवकर बरे व्हाल, देव तुमच्यासोबत आहे.’ आणखी एकाने लिहिलं की, ‘लवकर बरी हो हिना. तुला खूप प्रेम आणि खूप सकारात्मकता.’
संबंधित बातम्या