मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  ‘कल्की २८९८ एडी’ चित्रपटाविषयी मोठी अपडेट! प्रभास-दीपिका पादुकोणच्या चाहत्यांना बसणार मोठा धक्का

‘कल्की २८९८ एडी’ चित्रपटाविषयी मोठी अपडेट! प्रभास-दीपिका पादुकोणच्या चाहत्यांना बसणार मोठा धक्का

Harshada Bhirvandekar HT Marathi
Apr 06, 2024 10:16 AM IST

'कल्की २८९८ एडी' या चित्रपटाविषयी मोठी अपडेट समोर आली आहे, जी ऐकून चाहत्यांना मोठा धक्का बसू शकतो.

‘कल्की २८९८ एडी’ चित्रपटाविषयी मोठी अपडेट! प्रभास-दीपिका पादुकोणच्या चाहत्यांना बसणार मोठा धक्का
‘कल्की २८९८ एडी’ चित्रपटाविषयी मोठी अपडेट! प्रभास-दीपिका पादुकोणच्या चाहत्यांना बसणार मोठा धक्का

साऊथ सुपरस्टार प्रभास आणि दीपिका पादुकोण यांचा सायन्स-फिक्शन चित्रपट ‘कल्की २८९८ एडी'ची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाची प्रचंड क्रेझ निर्माण झाली आहे. दीर्घ प्रतिक्षेनंतर हा चित्रपट यावर्षी ९ मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला होता. मात्र, आता या चित्रपटाविषयी मोठी अपडेट समोर आली आहे, जी ऐकून चाहत्यांना मोठा धक्का बसू शकतो. 'कल्की २८९८ एडी'च्या रिलीजची तारीख पुन्हा बदलण्यात आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, २०२४च्या लोकसभा निवडणुकांमुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचे, म्हटले जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रभास आणि दीपिका पादुकोणचा 'कल्की २८९८ एडी' हा चित्रपट ९ मे रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार होता. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची चाहत्यांनाही खूप उत्सुकता होती. मात्र, आता अशा चर्चा सुरू आहेत की, या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलली जाऊ शकते. असे झाल्यास प्रभास आणि दीपिका पादुकोणचा चित्रपट पाहण्यासाठी त्यांच्या चाहत्यांना आणि प्रेक्षकांना बराच काळ वाट पाहावी लागू शकते.

नाटकाच्या प्रयोगादरम्यान नाडी तुटली अन् पायजामा खाली आला! अभिनेत्याचा हा भन्नाट किस्सा ऐकाच!

चित्रपट प्रदर्शन पुढे ढकलण्याचे कारण काय?

चित्रपट रिलीज होणाच्या कालावधीतच देशात लोकसभा निवडणुका होत आहेत. त्यातील पहिला टप्पा १९ एप्रिल रोजी होणार आहे. तर, १ जून रोजी शेवटच्या टप्प्यातील निवडणूक पार पडणार आहे. निवडणुकीच्या वातावरणामुळे या बिग बजेट चित्रपटावर बराच प्रभाव पडू शकतो, असे मानले जात आहे. साहजिकच याकाळात लोक निवडणुकीमध्ये व्यस्त असतील. त्यामुळे चित्रपटाच्या कलेक्शनवर याचा मोठा फरक पडू शकतो. यावेळी निर्मात्यांना चित्रपटाच्या कलेक्शनच्या बाबतीत कोणताही मोठा धोका पत्करायचा नाही. २०२४च्या लोकसभा निवडणुकीमुळे तेलुगू चित्रपट 'गँग्स ऑफ गोदावरी'चा रिलीजही पुढे ढकलण्यात आली आहे.

धमाल होणार; पुन्हा एकदा ‘फुलाला सुगंध माती’चा फेम समृद्धी केळकर आणि हर्षद अतकरीची जोडी जमणार!

चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली!

आयआयटी बॉम्बे येथे एका कार्यक्रमादरम्यान दिग्दर्शक नाग अश्विन यांनी 'कल्की २८९८ एडी' या चित्रपटाबद्दल बोलताना सांगितले की, 'आपल्या देशात विज्ञान आणि कल्पनेवर आधारित फार कमी चित्रपट बनले आहेत. आमच्याकडून चित्रपटासाठी खूप मेहनत घेण्यात आली आहे. आम्हाला विश्वास आहे की, हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडेल आणि चित्रपट आमच्या अपेक्षा पूर्ण करेल.’

अधिकृत निवेदन येणे अद्याप बाकी!

'कल्की २८९८ एडी' चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेत बदल करण्याबाबत निर्मात्यांकडून अद्याप कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही. हे अपडेट लवकरच समोर येईल अशी अपेक्षा आहे. प्रभास आणि दीपिका पादुकोण व्यतिरिक्त या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि कमल हासन यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. मोठ्या स्टारकास्टला घेऊन बनवलेल्या या चित्रपटाकडून निर्मात्यांना भरपूर अपेक्षा आहेत. चित्रपटगृहात दाखल झाल्यावर हा चित्रपट इतिहास रचतो का?, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

IPL_Entry_Point