भूषण प्रधान आणि शिवानी सुर्वें यांचा 'ऊन सावली' सिनेमा घर बसल्या पाहायचा? मग ही बातमी नक्की वाचा
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  भूषण प्रधान आणि शिवानी सुर्वें यांचा 'ऊन सावली' सिनेमा घर बसल्या पाहायचा? मग ही बातमी नक्की वाचा

भूषण प्रधान आणि शिवानी सुर्वें यांचा 'ऊन सावली' सिनेमा घर बसल्या पाहायचा? मग ही बातमी नक्की वाचा

Aarti Vilas Borade HT Marathi
Apr 10, 2024 03:56 PM IST

भूषण प्रधान आणि शिवानी सुर्वें यांचा 'ऊन सावली' हा सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट ज्या प्रेक्षकांनी चित्रपटगृहामध्ये पाहिलेला नाही त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे.

भूषण प्रधान आणि शिवानी सुर्वें यांचा 'ऊन सावली' सिनेमा घर बसल्या पाहायचा? मग ही बातमी नक्की वाचा
भूषण प्रधान आणि शिवानी सुर्वें यांचा 'ऊन सावली' सिनेमा घर बसल्या पाहायचा? मग ही बातमी नक्की वाचा

आजकाल अगदी सहज घरबसल्या जुने असो वा नवीन सर्वच चित्रपट पाहाता येतात. दिवसेंदिवस ओटीटी विश्वातमध्ये होत चाललेल्या बदलांचे प्रेक्षक स्वागत करत आहेत. मराठी असो वा हिंदी अनेक चित्रपट प्रदर्शनाच्या काही दिवसांमध्येच ओटीटीवर प्रदर्शित होत असल्याचे पाहायला मिळतात. मग ज्या प्रेक्षकांनी चित्रपटगृहामध्ये जाऊन चित्रपट पाहण्याची संधी गमावली ते घर बसल्या चित्रपट पाहण्याचा आनंद घेतात. असाच एक मराठी चित्रपट आता ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.

सुरुवातीच्या काळात ओटीटी प्लॅटफॉर्मवर मराठी चित्रपट प्रदर्शित होण्यास वेळ लागत असत. नेमके हे मराठी चित्रपट कुठे पाहायचे असा प्रश्न देखील अनेकदा प्रेक्षकांना पडले आहेत. आता त्यासाठी प्लॅनेट मराठी आणि अल्ट्रा झकास हे दोन मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म विशेष काम करतात. आता अल्ट्रा झकास या ओटीटी प्लॅटफॉर्मवर एक नवा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे.
वाचा: अजय देवगणचा 'मैदान' चित्रपट कसा आहे? थिएटरमध्ये जाण्यापूर्वी रिव्ह्यू नक्की वाचा

कधी प्रदर्शित होणार चित्रपट

मराठमोळा अभिनेता भूषण प्रधान आणि अभिनेत्री शिवानी सुर्वे मुख्य भूमिकेत असणाऱ्या 'ऊन सावली' या चित्रपटाची एक वेगळी चर्चा रंगली होती. दोन्ही मराठी चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय कलाकारांना एकत्र पाहण्याची संधी सर्वांना मिळाली होती. कांद्या पोह्याच्या कार्यक्रमातून पार पडलेल्या लग्नात प्रेमाचा गंध कसा दरवळत जातो हे या चित्रपटाच्या माध्यातून सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हा चित्रपट अल्ट्रा झकास या ओटीटी प्लॅटफॉर्मवर १२ एप्रिल २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. आता चाहते भूषण आणि शिवानीच्या या चित्रपटाती आतुरतेने वाट पाहात आहेत.
वाचा: 'स्नेहाने साजरा करा पाडव्याचा सण', गुढीपाडव्यानिमित्त माधुरी दीक्षितने शेअर केला मराठमोळा अंदाजातील व्हिडीओ

काय आहे चित्रपटाची कथा?

'ऊन सावली' या चित्रपटात प्रणय आणि अन्वी यांची कथा दाखवण्यात आली आहे. ते दोघेही त्यांच्या पालकांच्या आग्रहास्तव लग्नासाठी एकमेकांना भेटायला तयार होतात. प्रणय पहिल्या भेटीतच अन्वीच्या प्रेमात पडतो. मात्र, अन्वीची लग्न करण्याची फारशी इच्छा नसते. असे असतानाही त्यांचे लग्न धुमधडाक्यात होते हे खरे. मात्र लग्नानंतर काय गोंधळ सुरू होतो ते तुम्हाला चित्रपटात पहायला मिळणार आहे.
वाचा: गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सई ताम्हणकरची स्वप्नपूर्ती! खरेदी केली नवी आलिशान गाडी

कोणते कलाकार आहेत?

भूषण प्रधान आणि शिवानी सुर्वे यांच्यासह शिवानीचा खऱ्या आयुष्यातील पती अजिंक्य ननावरे हा चित्रपटात प्रमुख कलाकार म्हणून दिसत आहे. याचबरोबर राज शरणागत, अंकित भोईर, विकास हांडे, श्वेता कामत आणि प्रिया तुळजापूरकर यांच्या चित्रपटात दमदार भूमिका आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन दिवाकर नाईक यांनी केले आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचे महाराष्ट्रभर भरभरून प्रेम मिळाले होते.

Whats_app_banner