'प्रत्येक घरातली आणि घरातील प्रत्येकाची गोष्ट', 'घरत गणपती' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  'प्रत्येक घरातली आणि घरातील प्रत्येकाची गोष्ट', 'घरत गणपती' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

'प्रत्येक घरातली आणि घरातील प्रत्येकाची गोष्ट', 'घरत गणपती' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

Aarti Vilas Borade HT Marathi
Jul 13, 2024 07:51 AM IST

Gharat Ganpati Official Trailer: गेल्या काही दिवसांपासून तगडी स्टारकास्ट असलेला घरत गणपती हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

Gharat Ganpati
Gharat Ganpati

कोकणी माणसाचे आणि गणेशोत्सवाचे अजोड नाते आहे. ‘गणपती’ असा शब्दोच्चार जरी झाला तरी एक वेगळीच लहर कोकणी माणसाच्या मनाला स्पर्शून जाते. कोकणी माणसाला गणपतीत गावची ओढ लागण्याचं आणखी एक कारण कोकणवासी खरोखरच गोतावळा प्रिय असतो. नातेसंबंध जपण्यासाठी, पाहुणचारासाठी त्याची विशिष्ट अशी ओळख आहे. या सणाच्या निमित्ताने नात्यांचे बंध जपत उत्सवाचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी याहून अनोखी संधी असूच शकत नाही. याच गणपती उत्सवाच्या आनंददायी सोहळ्याचे आणि घरत कुटुंबातील नात्यांच्या बंधाची गोष्ट घेऊन 'घरत गणपती' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

काय आहे चित्रपटाची कथा?

'प्रत्येक घरातली आणि घरातील प्रत्येकाची' ही गोष्ट असून नातेसंबंधांचा सुरेख गोफ या चित्रपटात विणला आहे. कोकणातल्या एका सुखवस्तू कुटुंबातील ही गोष्ट आहे. घरातील गणपतीच्या निमित्ताने घरत कुटुंबात घडणाऱ्या सहज-साध्या गोष्टी, ज्यात गमतीजमती आहेत, राग-लोभ आहेत, एकमेकांविषयी वाटणारी माया आहे. नातेसंबंधातील प्रेम, गोडवा सणांच्या माध्यमातून निश्चितच निर्माण होत असतो. हाच धागा घेऊन सर्वांगसुंदर अशी ‘लंबोदर’ कथा 'घरत गणपती' या चित्रपटात पहायला मिळणार आहे. एकंदरीत चित्रपटाचा ट्रेलर पाहाता प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते.
वाचा: मराठमोळ्या अभिनेत्रीला अंबानी कुटुंबीयांच्या लग्नाचे आमंत्रण, शेअर केला खास व्हिडीओ

कोणते कलाकार दिसणार?

'घरत गणपती' या चित्रपटात निकिता दत्ता, भूषण प्रधान, अश्विनी भावे, अजिंक्य देव,संजय मोने, शुभांगी लाटकर, शुभांगी गोखले, डॉ.शरद भुताडिया, सुषमा देशपांडे, परी तेलंग,आशिष पाथोडे, रूपेश बने, राजसी भावे, समीर खांडेकर, दिव्यलक्ष्मी मैस्नाम अशी कलाकार मंडळी या चित्रपटात आहेत. पॅनोरमा स्टुडिओज सविनय सादर करत आहेत नॅविअन्स स्टुडिओ यांच्या सहकार्याने ‘घरत गणपती’ हा भव्य मराठी चित्रपट २६ जुलैला आपल्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर यांनी केले आहे.
वाचा: अभिनेते अशोक सराफ यांची आवडती मालिका कोणती? जाणून घ्या

जावेद अख्तर यांनी लिहिले चित्रपटातील गाणे

'घरत गणपती' चित्रपटाला साजेशी चार गाणी चित्रपटात असून 'माझा कोकण भारी' आणि 'नवसाची गौराई माझी' या गाण्यांना सोशल माध्यमावर उत्तम प्रतिसाद मिळतोय. श्रद्धा दळवी, समीर सामंत,अलोक सुतार यांनी लिहिलेल्या गीतांना जावेद अली, विशाल ददलानी, अभय जोधपूरकर, सायली खरे, ‘द कोकण कलेक्टिव्ह’ गर्ल्स यांनी स्वरबद्ध केलं आहे.
वाचा: Bigg Boss OTT 2 चा विजेता एल्विश यादव ईडीची नोटीस, सापाचे विष वापरल्यामुळे होणार चौकशी

Whats_app_banner