Kartik Aryan: बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनचा बहुचर्चित चित्रपट 'भूल भुलैया ३' हा १ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची टक्कर रोहित शेट्टीच्या मल्टीस्टारर चित्रपट 'सिंघम अगेन'शी होणार आहे. कार्तिक आणि अजय दोघेही आपापल्या चित्रपटांचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. दरम्यान, सोशल मीडियावर कार्तिकचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये कार्तिक चित्रपटाची कॅमिओवरुन रोहित शेट्टीवर निशाणा साधताना दिसत आहे.
'भूल भुलैया ३'ची टक्कर 'सिंघम अगेन'शी होणार असून 'सिंघम अगेन'मध्ये अजय देवगण, करिना कपूर, दीपिका पदुकोण, रणवीर सिंग, अक्षय कुमार, टायगर श्रॉफ, अर्जुन कपूर आणि जॅकी श्रॉफ असे अनेक कलाकार आहेत. यासोबतच सलमान खानचाही यात कॅमिओ आहे. त्यामुळे कार्तिकला एका मुलाखतीमध्ये विचारण्यात आले होते की 'भूल भुलैया ३' चित्रपटामध्ये कोणाचा कॅमिओ आहे का? त्यावर कार्तिकने उत्तर देत रोहित शेट्टीवर निशाणा साधला होता.
"'भूल भुलैया ३' ला कॅमिओ किंवा इतर कशाचीही गरज आहे असे मला वाटत नाही. भूल भुलैया हा कलाकारांचा सेट असलेला संपूर्ण चित्रपट आहे. यात आणखी नाटक करण्याची गरज नाही. आमचा आमच्या कथेवर आणि चित्रपटावर पूर्ण विश्वास आहे" असे म्हणत कार्तिक आर्यन रोहित शेट्टीला अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.
सोशल मीडियावर कार्तिक आर्यनचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर कमेंट करत एका यूजरने, 'कार्तिकने रोहितला जबरदस्त स्टाईलने सुनावले आहे.' दुसऱ्या एका यूजरने, 'वाह! 'सिंघम अगेन'वर गमतीशीर टीका' अशी कमेंट केली आहे. तिसऱ्या एका यूजरने, 'चित्रपटावर विश्वास ठेवा, मग तू असुरक्षित का वाटत आहे' असे म्हटले आहे.
वाचा : लसणाच्या पाकळ्या खाऊन 'या' मराठमोळ्या अभिनेत्याने काढले दिवस, विनय आपटेंना कळाले अन् बदलले आयुष्य
'भूल भुलैया ३' या चित्रपटात कार्तिक सोबत तृप्ती डिमरी, विद्या बालन, माधुरी दीक्षित, संजय मिश्रा, राजपाल यादव आणि विजय राज यांच्याही भूमिका आहेत. तगडी स्टार कास्ट असल्यामुळे चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. १ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कमाई करतो हे पाहण्याजोगे आहे.
संबंधित बातम्या