मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Bhool Bhulaiyaa 3: पुन्हा येणार रुह बाबा! 'भूल भूलैय्या ३'चा टीझर प्रदर्शित

Bhool Bhulaiyaa 3: पुन्हा येणार रुह बाबा! 'भूल भूलैय्या ३'चा टीझर प्रदर्शित

Aarti Vilas Borade HT Marathi
Mar 02, 2023 08:24 AM IST

Kartik Aryan: अभिनेता कार्तिक आर्यनने भूलभूलैय्या ३चा टीझर शेअर करत सर्वांचे लक्ष वेधले आहे.

कार्तिक आर्यन
कार्तिक आर्यन (HT)

काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'भूलभुलैया'ने प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या अभिनयाने त्या चित्रपटाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले होते. त्यानंतर या चित्रपटाचा दुसरा भाग आला. त्यामध्ये अक्षय ऐवजी अभिनेता कार्तिक आर्यन पाहायला मिळाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली. त्यापाठोपाठ 'भूल भुलैया ३'ची जोरदार चर्चा रंगली होती. आता हा चित्रपट खरच येत असल्याचे स्वत: कार्तिक आर्यनने सांगितले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

कार्तिक आर्यनने सोशल मीडियावर भूलभूलैय्या ३ चा टीझर रिलीज करुन शिक्कामोर्तब केले आहे. या टीझरची सुरुवात ही एका हवेली पासून होते. त्यानंतर पुढे रुह बाबा बनलेल्या कार्तिकचा आवाज ऐकू येतो. रुह बाबा म्हणतो,'' काय वाटले? कहाणी संपली? दरवाजे बंदच अशासाठी होतात की एकदिवस पुन्हा त्या दरवाजांना आपण खोलावे." पुढे चित्रपटातील 'आमी जे तोमार' गाणे ऐकू येते. टीझरच्या शेवटी रुह बाबा म्हणतो की 'यावेळी मी आत्म्यांशी फक्त बोलणार नाही..तर आत्मा माझ्या शरीरातही प्रवेश करतील.'
वाचा: 'बिग बॉस १६'चा विजेता एमसी स्टॅन अडकणार लग्नबंधनात, गर्लफ्रेंडलचा फोटो पाहिलात का?

कार्तिक आर्यनने टीझरला शेअर करत लिहिलं की,''रूह बाबा रिटर्न्स दिवाली २०२४. म्हणजे हा हॉरर कॉमेडी सिनेमा दिवाळीच्या ऐन मुहूर्तावर प्रदर्शित होत आहे''.एकंदरीत चित्रपटाचा टीझर पाहाता चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते.

भूलभुलैय्या २ या चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर चित्रपट तुफान हिट ठरला होता. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने तुफान कमाई केली होती. २०२२मधील सुपरहिट चित्रपट ठरला होता. आता तिसऱ्या भागात कार्तिकसोबत कोण दिसणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग