Bhool Bhulaiyaa 3 Ticket Cost : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनचा मोस्ट अवेटेड हॉरर कॉमेडी चित्रपट 'भूल भुलैया ३' दिवाळीच्या खास मुहूर्तावर थिएटरमध्ये दाखल होणार आहे. या चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. अनीस बज्मी दिग्दर्शित या चित्रपटात कार्तिक व्यतिरिक्त विद्या बालन, माधुरी दीक्षित, तृप्ती डिमरी आणि राजपाल यादव हे कलाकार दिसणार आहेत. चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकींगबाबतही अनेक बातम्या समोर येत आहेत. आता या चित्रपटाचे सगळ्यात महागडे तिकीट कितीला विकले जात आहे, हे समोर आले आहे.
या चित्रपटाने रिलीजपूर्वीच एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. १ नोव्हेंबर रोजी थिएटरमध्ये दाखल होणाऱ्या या चित्रपटाच्या तिकिटांच्या किंमती आतापर्यंतच्या सर्वात उच्चांकावर आहेत. या चित्रपटाची तिकिटे कार्तिक आर्यनच्या कारकिर्दीतील सर्वात महाग तिकीट म्हणून विकली जात आहेत. बहुतेक शहरांमध्ये तिकिटाची किंमत १००, २०० किंवा ३०० रुपयांपासून सुरू होते, हे सर्वांनाच माहीत आहे. परंतु, या चित्रपटाच्या तिकिटांच्या किमतीने सर्वांचेचे डोळे पांढरे केले आहेत. 'भूल भुलैया ३' या चित्रपटाच्या तिकीटाची किंमत २०० रुपयांपासून सुरू होत आहे.
कार्तिक आर्यनच्या चित्रपटाचे सर्वात महागडे तिकीट मुंबईतील बुक माय शोमध्ये २७०० रुपयांना विकले जात आहे. तर, दिल्ली-एनसीआर सर्कल देखील यामध्ये मागे नाही. दिल्लीत ‘भूल भुलैया ३’चे सर्वात महाग तिकीट पीव्हीआर डायरेक्टर्स कट, ॲम्बियन्स मॉलमध्ये २४०० रुपयांना विकले जात आहे. तथापि, या किमतींमध्ये सुविधा शुल्क आणि कर समाविष्ट नाहीत. यावरून हे स्पष्टपणे समजू शकते की, चाहते या चित्रपटाबद्दल किती उत्सुक आहेत आणि ते हा चित्रपट पाहण्यासाठी आतुर झाले आहेत.
'भूल भुलैया' फ्रँचायझीचा तिसरा चित्रपट 'भूल भुलैया ३' दिवाळीच्या मुहूर्तावर म्हणजेच १ नोव्हेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट पहिल्यांदा २००७मध्ये प्रदर्शित झाला होता, ज्याचे दिग्दर्शन प्रियदर्शनने केले होते आणि यामध्ये अक्षय कुमार आणि विद्या बालन सारखे इतर अनेक कलाकार दिसले होते. हा चित्रपट मल्याळम चित्रपट 'मणिचित्रथु' चा हिंदी रिमेक होता, जो प्रेक्षकांना खूप आवडला होता. यानंतर त्याचा सिक्वेल 'भूल भुलैया २' हा चित्रपट २०२२मध्ये रिलीज झाला होता, ज्यामध्ये कार्तिक आर्यन दिसला होता. त्याचा हा चित्रपट सुपरहिट ठरला होता.
संबंधित बातम्या