bhool bhulaiyaa 3 box office collection : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री तृप्ती डिमरी यांच्या 'भूल भुलैया ३' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला आहे. या चित्रपटाने कार्तिक आर्यनच्या कारकिर्दीत पहिल्या दिवशी कमाई करण्याचे सर्व विक्रम मोडले आहेत. प्रदर्शनाच्या दिवशी कार्तिक आर्यनच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत 'भूल भुलैया २' (१४.११ कोटी), 'सत्यप्रेम की कथा' (९.२५ कोटी) आणि 'पती पत्नी और वो' (९.१० कोटी) या सारख्या चित्रपटांचा समावेश आहे. ‘भूल भुलैया ३’ ला ३० कोटींपेक्षा जास्त ओपनिंग मिळेल, असा दावा निर्माते सातत्याने करत होते आणि तसेच झाले आहे.
चित्रपटाचे ओपनिंग डे कलेक्शन जवळपास ३५.५ कोटी रुपये झाले आहे. सकाळच्या शोजला विशेष प्रतिसाद मिळाला नसला, तरी दुपार आणि संध्याकाळच्या शोजमध्ये ८० टक्क्यांहून अधिक बुकिंग झाले आहे. ‘भूल भुलैया ३’ला मुंबई, चेन्नई, जयपूर आणि लखनौसारख्या शहरांमध्ये उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचे आकडे सॅकनिल्कने जाहीर केले असले तरी ते अधिकृत आकडे नाहीत. निर्माते जाहीर करणाऱ्या आकडेवारीत थोडा फरक असू शकतो. पण, तरीही कार्तिक आर्यनच्या चित्रपटासाठी ही नक्कीच दमदार सुरुवात आहे.
लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे दोन्ही चित्रपटांना उत्तम ओपनिंग मिळाली असली, तरी आता खरा खेळ इथूनच पहायला मिळणार आहे. कारण दोन्ही चित्रपट प्रेक्षकांसमोर आहेत. त्यामुळे आता या चित्रपटाकडे अधिक लक्ष दिले जाणार असून, दोन्हीमध्ये स्पर्धा रंगणार आहे. ‘भूल भुलैया’ आणि ‘सिंघम’ या दोन्ही चित्रपटांची आपापली फॅन फॉलोइंग आहे. या दोन्ही सीरिजचा एकही चित्रपट आजपर्यंत फ्लॉप झालेला नाही. पण, जेव्हा दोन्ही चित्रपट एकाच वेळी प्रदर्शित होतील, तेव्हा प्रेक्षक काय चांगले आहे, ते निवडतील.
कार्तिक आर्यनच्या भारतीय बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर, यात 'भूल भुलैया २' (१८५ कोटी) आणि 'सोनू के टीटू की स्वीटी' (१०८ कोटी) या नावांचा समावेश आहे. आता ‘भूल भुलैया ३’ हा कार्तिक आर्यनचा आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरू शकतो का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. या चित्रपटाचे किंमतच १५० कोटी रुपये आहे, म्हणजेच बजेट मिळवण्यासाठी चित्रपट एवढी कमाई करावी लागणार आहे.