Bhool Bhulaiyaa 3 vs Singham Again: रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सिंघम अगेन' या चित्रपटाच्या प्रदर्शनाची प्रेक्षक अनेक वर्षांपासून आतुरतेने वाट पाहत होते. या मल्टिस्टारर चित्रपटाने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. अजय देवगणच्या पोलीस युनिव्हर्स सिंघमचा तिसरा भाग ‘सिंघम अगेन’ १ नोव्हेंबरला प्रदर्शित झाला आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी मोठी पसंती दर्शवली. सुरुवातीच्या काळात या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैया ३'ला कडवी टक्कर दिली होती. मात्र, आता दोन्ही चित्रपटांचे फ्रायडे कलेक्शन समोर आले आहे.
'सिंघम अगेन' अजय देवगणच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा ओपनर ठरला. या चित्रपटात अजय देवगण, रणवीर सिंह, अक्षय कुमार, करीना कपूर खान, दीपिका पदुकोण, अर्जुन कपूर, टायगर श्रॉफ आणि जॅकी श्रॉफ यांच्या प्रमुख भूमिका आहेत. बॉक्स ऑफिसवर ‘सिंघम अगेन’ आणि 'भूल भुलैया ३' या चित्रपटांत चुरस पाहायला मिळत आहे.
'सिंघम अगेन'ने आपल्या पहिल्या दिवसाच्या कलेक्शनने सर्वांना चकीत केले. पहिल्याच दिवशी 'सिंघम अगेन'ने ४३.५ कोटींची कमाई केली. फ्रायडे कलेक्शन नजर टाकली असता सॅनिल्कच्या सुरुवातीच्या रिपोर्टनुसार अजय देवगणच्या चित्रपटाने ८ व्या दिवशी ७.५० कोटी रुपयांची कमाई केली. तर, भूल भुलैया ३ ने आठ दिवसांत ९ कोटी रुपयांचे कलेक्शन केले.
पहिला दिवस - ४३.५ कोटी रुपये
दुसरा दिवस - ४२.५ कोटी रुपये
तिसरा दिवस - ३५.७५ कोटी रुपये
चौथा दिवस - १८ कोटी रुपये
पाचवा दिवस - १४ कोटी रुपये
सहावा दिवस - १०.५ कोटी रुपये
सातवा दिवस - ८.७५ कोटी रुपये
आठवा दिवस - ७.५० कोटी (अर्ली रिपोर्ट)
एकूण कलेक्शन- १८०.५० कोटी (अर्ली रिपोर्ट)