Bhool Bhulaiyaa 3 and Singham Again Box Office Collection Day 3: बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैया ३' या चित्रपटाची या दिवाळीत अजय देवगणच्या 'सिंघम अगेन'शी टक्कर झाली. दोन्ही चित्रपट एकत्र प्रदर्शित होऊनही चांगली कमाई करत आहेत. मात्र, अद्याप दोघांनाही आपला खर्च वसूल करता आलेला नाही. हॉरर कॉमेडी चित्रपट भूल भुलैया 3 चे ओपनिंग डे कलेक्शन ३६ कोटी ६०लाख रुपये होते तर सिंघम अगेनने रिलीज डेटवर ४३ कोटी ७० लाख रुपये कमावले होते. दुसऱ्या दिवशी जिथे भूल भुलैया ३ च्या कमाईत वाढ झाली, तिथे सिंघम अगेनच्या कमाईत घट झाली.
भूल भुलैया ३ ने शनिवारी भारतीय बॉक्स ऑफिसवर ३७ कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर सिंघम अगेनची कमाई २.३० टक्क्यांनी घसरून ४२.५ कोटी रुपये झाली. तिसऱ्या दिवशी अंदाजे ३५ कोटी रुपयांची कमाई जोडल्याने 'सिंघम अगेन'चे कलेक्शन १२१ कोटी रुपयांवर गेले आहे. तर भूल भुलैया ३ (३३ कोटी ५० लाख)च्या तिसऱ्या दिवसाची अंदाजे कमाई जोडली तर त्याचे पहिल्या वीकेंडचे एकूण कलेक्शन फक्त १०६ कोटी रुपये झाले आहे. म्हणजेच दोन्ही चित्रपटांनी काही खास कमाई केलेली नाही.
ओपनिंग वीकेंडमध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत 'भुलैया ३' पहिल्या २० मध्येही स्थान मिळवू शकलेला नाही, तर रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन' या चित्रपटाने 'सूर्यवंशी'चा विक्रम मोडला आहे. याशिवाय 'सिंघम अगेन'चे पहिले वीकेंड कलेक्शन तान्हाजी (११८.९१ कोटी), रईस (११८.३६ कोटी) आणि साहो (११६.०३ कोटी) यांच्यापेक्षा जास्त आहे. याशिवाय सलमान खानचा बॉडीगार्ड (११५ कोटी) आणि ट्यूबलाइट (१०६.८६ कोटी) यांनी ही कमाई केली आहे.
वाचा: 'दृष्ट लागण्या जोगे सारे' गाण्यातील अभिनेत्रीला खरोखरच लागली दृष्ट? अगदी कमी वयात घेतला जगाचा निरोप
सिंघम एक सुपरहिट फ्रँचायझी आहे आणि त्याच्या पुढच्या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. भूल भुलैयाचा मागील भाग ब्लॉकबस्टर हिट झाला होता आणि चाहते कार्तिक आर्यनला पुन्हा एकदा रूह बाबाच्या भूमिकेत पाहण्यासाठी आतुर होते. दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले असले तरी अधिकृत आकडेवारीची अद्याप प्रतीक्षा आहे.
(टीप: कमाईचे आकडे बॉलिवूड हंगामा, सेकनिक आणि ट्रेड एक्स्पर्ट तरण आदर्श यांच्या हँडलवरून घेण्यात आले आहेत)