Kartik Aryan Bought new car: भुल भुलैय्या ३ या चित्रपटामुळे सध्या चर्चेत असणारा अभिनेता म्हणजे कार्तिक आर्यन. त्याने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर वेगळी छाप सोडली आहे. कार्तिक त्याच्या चित्रपटांपासून ते खासगी आयुष्यामुळे कायमच सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसतो. नुकताच कार्तिकने नवी कार खदेरी केल्याची माहिती समोर आली आहे. आता त्याने कोणती कार घेतली आहे हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
कार्तिककडे काही लग्झरी गाड्यांचे कलेक्शन आहे. आता या कलेक्शनमध्ये त्याने आणखी एक गाडी अॅड केली आहे. कार्तिकने नवी एसयूवी कार खरेदी केली आहे. या कार सोबतचा फोटो त्याने सोशल मीडियावरव शेअर केला आहे. कार्तिकच्या या लग्झरी कारची किंमत ऐकून तुम्हालाही धक्का बसेल.
वाचा: राम गोपाल वर्माची राजकारणात एण्ट्री, ‘या’ ठिकाणाहून लढणार निवडणूक
बॉलिवूड कलाकार हे कायमच त्यांच्या लग्झरी लाइफस्टाइलमुळे ओळखले जातात. त्यांची घरे, गाड्या, कपडे, ज्वेलरी पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात. आता बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनने नवी गाडी खरेदी केली आहे. या लग्झरी गाडीची चर्चा होताना दिसत आहे. कार्तिकने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर गाडीसोबतचा फोटो शेअर केला आहे. त्यामुळे सर्वजण या फोटोवर लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.
वाचा: ओटीटीवर एकाच दिवशी प्रदर्शित होणार तब्बल ८ सिनेमे अन् वेब सीरिज, तारीख नोट करा!
कार्तिकने नव्या गाडीची पूजा करतानाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये काळ्या रंगाची रेंज रोवर एसयूवी ही गाडी दिसत आहे. या लग्झरी गाडीची किंमत ५.५ कोटी रुपये म्हणजेच ६ कोटी कोटी रुपये आहे.
वाचा: ‘लापता लेडीज’ सिनेमा कसा आहे? सलमान खानने दिला रिव्ह्यू
यापूर्वी ही कार्तिकने लग्झरी गाड्या खरेदी केल्या आहेत. ही त्याची चौथी गाडी असल्याचे म्हटले जात आहे. त्याच्याकडे लँबोर्गिनी, मॅकलेरन आणि पॉर्श या तीन गाड्या आहेत. आता कार्तिकने रेंज रोवर ही गाडी खरेदी केली आहे. कार्तिकच्या या आलिशान गाड्या चाहत्यांचे आकर्षण ठरत आहे.