बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री भूमी पेडणेकर यांचा 'भीड' हा चित्रपट २४ मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत संपूर्ण देशभरात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर निर्माण झालेली कठीण परिस्थिती दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी चित्रपटाद्वारे लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. 'भीड' चित्रपटाची कथा लॉकडाऊनच्या काळात लोकांना ज्या वेदना सहन कराव्या लागल्या त्यांचे चित्रण आहे. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करताना दिसत नाही.
भीड चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरताना दिसत आहे. पहिल्या दिवशी चित्रपटाने ४० लाख रुपयांची कमाई केली आहे. विकेंडला चित्रपटाने १ कोटी ४० लाख रुपयांची कमाई केली आहे. चित्रपटाचे बजेट हे २५ कोटी रुपये आहे. मात्र चित्रपट बजेटही कमावून देण्यात अयशस्वी ठरले आहे. एकंदरीत चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरल्याचे दिसत आहे. प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे अनेक शो कॅन्सल होताना दिसत आहे.
वाचा: कॉलेजच्या मुलीच्या प्रेमात पडला रामचरण, ‘अशी’ सुरु झाली लव्हस्टोरी
या चित्रपटात राजकुमार राव, भूमी पेडणेकर यांच्यासह आशुतोष राणा, आदित्य श्रीवास्तव, पंकज कपूर, दिया मिर्झा यांसारख्या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. 'भीड' चित्रपटाचे दिग्दर्शन इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी केले आहे. या आधी अनुभव सिन्हा यांनी 'आर्टिकल १५' आणि 'मुल्क' सारखे चित्रपट केले आहेत. ‘भीड’ या चित्रपटाची कथा अनुभव सिन्हा, सौम्या तिवारी, सोनाली जैन यांनी लिहिली आहे. अनुभव सिन्हा आणि भूषण कुमार यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
संबंधित बातम्या