शाहरुख खानने सुहाना खान आणि अनन्या पांडेला मजबूत बनवले आहे; भावना पांडेने व्यक्त केल्या भावना
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  शाहरुख खानने सुहाना खान आणि अनन्या पांडेला मजबूत बनवले आहे; भावना पांडेने व्यक्त केल्या भावना

शाहरुख खानने सुहाना खान आणि अनन्या पांडेला मजबूत बनवले आहे; भावना पांडेने व्यक्त केल्या भावना

Aarti Vilas Borade HT Marathi
Nov 23, 2024 03:06 PM IST

Bhavana Pandey: भावना पांडेने शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानबद्दलही सांगितले की, तो सर्वात गोड मुलांपैकी एक आहे.

Bhavana Pandey
Bhavana Pandey

बॉलिवूडमधील खान कुटुंबीय आणि पांडे कुटुंबीय अतिशय जवळ असल्याचे पाहायला मिळते. शाहरुख खानची लेक सुहाना आणि अनन्या पांडे यांची मैत्री सर्वांना माहिती आहे. तसेच भावना पांडेचे शाहरुख खान आणि गौरी खान सोबतच्या खास नात्याविषयी देखील चर्चा होते. नुकताच भावनाने एका मुलाखतीमध्ये शाहरुख खान अनन्या आणि सुहानाला खास धडे देत असल्याचे सांगितले आहे. चला जाणून घेऊया भावना काय म्हणाली...

भावना पांडेने नुकताच सिद्धार्थ कन्ननला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये भावनाने सांगितले की, शाहरुखचा तिच्या मुलांवर लहानपणापासूनच सकारात्मक संस्कार केले आहेत. आपल्या मुलांना निरोगी स्पर्धेचे महत्त्व शिकविण्याचे श्रेय तिने अभिनेत्याला दिले. या मुलाखतीदरम्यान भावनाने शाहरुख खानचा मुलांवर असलेला प्रभाव सांगितला. "त्यांच्याकडून शिकण्यासारखं बरंच काही आहे. आणि मुलांनी त्याच्या भोवती इतका वेळ घालवला याचा मला खरंच खूप आनंद आहे. कारण शाहरुख खान होण्याबद्दल नाही, तर तो सुहाना, आर्यन आणि आता अबरामचा पिता म्हणून कसा आहे. आणि तो माझ्या मुलांसोबत कसा आहे. हे आश्चर्यकारक आहे," असे ती म्हणाली.

शाहरुख अनेकदा सुहाना, अनन्या आणि शनाया यांना खेळाचे प्रशिक्षण देत असे, असे भावनाने सांगितले. "त्याच्याकडे जो काही मोकळा वेळ होता, तो त्यांना प्रशिक्षण देऊ इच्छित होता, जे आश्चर्यकारक होते. खेळ, धावणे, फुटबॉल हे सगळे खेळ तो मुलांसोबत खेळायचा. कारण मला वाटतं तो स्वत: खूप अॅक्टिव्ह स्पोर्टी व्यक्ती आहे. मी आणि चंकी खेळासाठी आळशी व्हायचो. शाहरुखने त्यांना निरोगी पद्धतीने स्पर्धात्मक राहण्याची कला शिकवली जी सुंदर होती आणि तो नेहमीच आर्यन आणि मुलांपेक्षा त्यांची बाजू घेत असे" असे भावना म्हणाली.

भावनाने आर्यन खानबद्दल बोलताना त्याला "सर्वात गोड मुलांपैकी एक" म्हटले आहे. आर्यनला त्याच्या लहानपणीच्या मित्रांबद्दल प्रोटेक्टिव्ह का वाटते? असा प्रश्न भावनाला विचारण्यात आला होता. त्यावर भावना म्हणाली की, शाहरुखने सर्व मुलींना इतके मजबूत बनवले आहे की त्या स्वतःचे रक्षण करू शकतात.
वाचा: कोणी पत्नीचे दागिने गहाण ठेवले तर कोणी राहते घर; कर्जात बुडाले होते 'हे' मराठी कलाकार, पण...

भावना आणि चंकीविषयी

भावनाने चंकी पांडेसोबत १७ जानेवारी १९९८ रोजी लग्न केले होते. या जोडप्याला अनन्या आणि रायसा पांडे या दोन मुली आहेत. चंकी आणि भावना २०२० मध्ये नेटफ्लिक्सच्या फॅब्युलस लाईव्ह्स ऑफ बॉलिवूड वाइव्ह्स या शोमध्ये दिसले होते. या रिअॅलिटी शोमुळेच ती प्रकाश झोतात आली. नुकतीच ती नीलम कोठारी सोनी, महीप कपूर आणि सीमा किरण सजदेह यांच्यासोबत 'द फॅब्युलस लाईव्ह्स ऑफ बॉलिवूड वाइव्हज'च्या सीझन ३ मध्ये दिसली होती. गौरी खान आणि शाहरुखसोबत भावनाचे घनिष्ठ नाते आहे. अनन्या सुहानाच्या बेस्ट फ्रेंड्सपैकी एक आहे.

Whats_app_banner