मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  BhauBali: भावना दुखावल्यात त्यापण गुरुवारी, उपवासाच्या दिवशी; 'भाऊबळी'चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

BhauBali: भावना दुखावल्यात त्यापण गुरुवारी, उपवासाच्या दिवशी; 'भाऊबळी'चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

Aarti Vilas Borade HT Marathi
Aug 26, 2022 02:06 PM IST

Jayant Pawar: 'भाऊबळी' या चित्रपटाचे लेखन जयंत पवार यांनी केले आहे. हा चित्रपट १६ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

भाऊबळी
भाऊबळी (HT)

गेल्या काही दिवसांपासून 'भाऊबळी' या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. विनोदाचा तडका असणाऱ्या या नव्या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते. आता या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून तो पाहून सर्वांना हसू अनावर झाले आहे.

भाऊबळी या चित्रपटाच्या १ मिनिटे ४७ सेकंदाच्या ट्रेलरमध्ये सोपारवाडी गावाची कथा दाखवण्यात आली आहे. सोसायटीमध्ये राहणारे लोक आणि एका वस्तीमध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये होणारा संघर्ष या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. दरम्यान, त्यांच्यामधील मजेशीर संवाद पाहायला मिळतात. एकंदरीच ट्रेलर पाहाता प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

'भाऊबळी' या चित्रपटाचे लेखन जयंत पवार यांनी केले आहे. तसेच चित्रपटाचे दिग्दर्शन समीर पाटील करत असून हा चित्रपट १६ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात चित्रपटात मनोज जोशी, हृषीकेश जोशी, संतोष पवार, किशोर कदम, मेधा मांजरेकर, रेशम टिपणीस, आशय कुलकर्णी हे कालाकार दिसणार आहेत. कलाकार पाहता प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते. दिग्दर्शक समीर पाटील यांनी याआधी शेंटिमेंटल, पोश्टर बॉय, पोश्टर गर्ल या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे

WhatsApp channel

विभाग