छोट्या पडद्यावरील 'डान्स दिवाने' या कार्यक्रमाच्या सेटवरील एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये कार्यक्रमाची सूत्रसंचालक भारती सिंह फोटोग्राफर्ससोबत मजामस्ती करताना दिसत आहे. दरम्यान, एका चाहत्याने भारतीला डोरेमॉन म्हणून आवाज दिला आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.