मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Bharti Singh: ३ दिवस सतत त्रास झाल्यानंतर कॉमेडियन भारती सिंह रुग्णालयात दाखल, होणार सर्जरी

Bharti Singh: ३ दिवस सतत त्रास झाल्यानंतर कॉमेडियन भारती सिंह रुग्णालयात दाखल, होणार सर्जरी

Aarti Vilas Borade HT Marathi
May 03, 2024 11:47 AM IST

कॉमेडियन भारती सिंह ही सध्या रुग्णालयात दाखल झाली असून लवकरच तिच्यावर शस्त्रक्रिया होणार आहे. भारतीला नेमकं काय झालं? हे चला जाणून घेऊया..

३ दिवस सतत त्रास झाल्यानंतर कॉमेडियन भारती सिंह रुग्णालयात दाखल, होणार सर्जरी
३ दिवस सतत त्रास झाल्यानंतर कॉमेडियन भारती सिंह रुग्णालयात दाखल, होणार सर्जरी

प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंहची प्रकृती खालावल्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या तीन दिवसांपासून भारतीच्या पोटात दुखत होते. सुरुवातीला गॅस्ट्रोचा त्रास होत असल्याचे समजून भारतीने त्याकडे दुर्लक्ष केले. पण आता भारतीला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती समोर आली आहे. भारतीच्या प्रकृतीविषयी डॉक्टरांनी देखील माहिती दिली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

भारतीने तिच्या यूट्यूब चॅनेलवर एक भावनिक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती रुग्णालयात दाखल असल्याचे दिसत आहे. तसेच तिने व्हिडीओच्या सुरुवातीला चाहत्यांची माफी मागितली आहे. कारण तिने हा व्हिडीओ रुग्णालयात शूट केला आहे. गेल्या तीन दिवसांपासून भारतीला असह्य वेदना होत आहे. तिच्या या दुखण्यामुळे कुटुंबीय देखील झोपले नाहीत. पहिले दोन दिवस हर्ष भारतीसोबत जागा होता. तिला काय हवं नको ते पाहात होता.
वाचा: 'तिकडे वडिलांना अग्नी देत होते आणि मी हास्यजत्रेच्या खूर्चीत', प्रसाद ओकने सांगितला धक्कादायक अनुभव

काय म्हणाली भारती?

भारतीने व्हिडीओमध्ये चाहत्यांना विनंती केली आहे की ती लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी चाहत्यांनी प्रार्थना करावी. तसेच गेल्या काही दिवसांपासून भारतीने अन्न आणि पाण्याचा कण खाल्लेला नाही. तसेच भारतीला वाईट वाटत आहे की तिला कुटुंबातील माणसे एक एक करुन भेटायला येत आहेत. व्हिडीओमध्ये भारतीने असे देखील म्हटले आहे की ती आजवर गोलूला सोडून राहिलेली नाही. पण आता रहावे लागत आहे.
वाचा: 'तुला पाहते रे' मालिकेतील अभिनेत्रीचे छोट्या पडद्यावर पुनरागम, नवा प्रोमो प्रदर्शित

काय झाले भारतीला?

भारतीला मुंबईतील कोकीलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या तीन दिवसांपासून तिच्या पोटात दुखत आहे. असह्य वेदना होत आहेत. सुरुवातीला गॅस्ट्रेचा त्रास होत असेल म्हणून भारतीने दुर्लक्ष केले. पण जेव्हा ती डॉक्टरकडे गेली तेव्हा तिला सर्जरी करण्यास सांगितली. भारतीच्या पोटात पित्ताशयाचे खडे झाले आहेत. ते खडे काढण्यासाठी सर्जरी केली जात आहे. सध्या भारतीवर उपचार सुरु आहेत. तसेच तिचा मुलगा गोलू अजून तिला भेटण्यासाठी रुग्णालयात आलेला नाही. गोलू पहिल्यांदाच भारतीला सोडून राहिला आहे. त्यामुळे भारतीला रुग्णालयात पाहून तो कशी प्रतिक्रिया देतो हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुर आहेत.
Heeramandi Review: अंगावर शहारे आणणारी सीरिज! संजीदा शेख सोनाक्षी सिन्हा हिचावर भारी

IPL_Entry_Point

विभाग