'चला हवा येऊ दया' या कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या घरात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. त्यातही कार्यक्रमातील कलाकार आपल्या अचूक विनोदी टायमिंगने प्रेक्षकांना पोट धरून हसायला भाग पाडतात. याच कार्यक्रमातील लोकप्रिय विनोदवीर भारत गणेशपुरे (bharat ganeshpure)सध्या चाहत्यांमध्ये चर्चेत आहे. कारण काय तर त्याचं तिसरं लग्न. वाचून धक्का बसला ना? हो पण भारत तिसऱ्यांदा बोहोल्यावर चढायला तयार झाला आहे. तो पहिल्या पत्नीसोबतच पुन्हा एकदा लग्नगाठ बांधणार आहे. त्याच्या या सोहळ्याचे फोटोही सोशल मीडियावर वायरल झाले आहेत.
झी मराठीवरील मालिका 'बॅण्ड बाजा वरात'ने सध्या नव्या संकल्पनेसह नवीन भागांचं चित्रीकरण सुरू केलं आहे. यात लोकप्रिय जोडप्यांची पुन्हा एकदा लग्न लावण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाच्या पहिल्याच भागात भारत याचं लग्न दाखवण्यात येणार आहे. भारतच्या लग्नाला २२ वर्ष झाली आहेत. भारतने अर्चना यांच्यासोबत विवाह केला आहे. त्यांना १२ वर्षाचा मुलगा देखील आहे. आता या कार्यक्रमात तो पुन्हा एकदा अर्चना यांच्यासोबत बोहोल्यावर चढणार आहे. तर त्यांचा मुलगा देखील आई- वडिलांचं लग्न पुन्हा होताना पाहणार आहे.
यापूर्वी २०१८ साली भारतने अर्चना यांच्यासोबत दुसऱ्यांदा विवाह केला होता. त्याला कारणही तसंच होतं. भारत काही वर्षांपूर्वी परदेश दौ-यावर असताना त्याला सौम्य अटॅक आला होता. भारतचा ज्योतिषशास्त्रावर फार विश्वास आहे. त्याने तातडीने ज्योतिषाकडे हात दाखवला. तर त्यांच्या गुरुजींनी त्यांना पुन्हा एकदा लग्न करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे भारतने वेळ न दवडता ज्योतिषाचं म्हणणं ऐकलं आणि पुन्हा लग्नाचा निर्णय घेतला. लग्नासाठी 9 मेचा मुहूर्तही निश्चित केला आणि ठरल्यानुसार दोघे पुन्हा एकदा बोहल्यावर चढले. विशेष म्हणजे लग्नापूर्वी भारत आणि अर्चना यांना हळद देखील लागली. हळदीच्या कार्यक्रमाला श्रेया बुगडे आवर्जुन हजर होती.
संबंधित बातम्या