बंगाली सिनेसृष्टीतून मोठी बातमी समोर येत आहे. बंगाली इंडस्ट्री सध्या श्रीलेखा मित्रा यांच्यामुळे चर्चेत आहे. श्रीलेखा मित्रा ही बंगाली चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेत्रींपैकी एक आहे. बंगाली चित्रपट करण्यापूर्वी श्रीलेखाने मल्याळम इंडस्ट्रीत आपल्या करिअरची सुरुवात केली होती. पण सुरुवातीच्या काळात श्रीलेखासोबत असं काही घडलं, ज्यामुळे ती खूप घाबरली. नुकताच तिने याबाबत माहिती दिली आहे. तिने एका प्रसिद्ध निर्मात्यावर गंभीर आरोप केले आहेत.
केरळ चलचित्र अकादमी रणजितचे संचालक आणि अध्यक्ष यांच्यावर श्रीलेखाने गंभीर आरोप केले आहेत. रणजितने तिला बेडरूममध्ये तर बोलावलेच, शिवाय चुकीच्या पद्धतीने स्पर्शही केला असे श्रीलेखाने सांगितले. २००९ मध्ये 'पालेरी माणिक्यम : ओरू पाथिरकोलापथथिंते कथा' या चित्रपटाच्या ऑडिशनदरम्यान श्रीलेखाने रणजितवर तिच्यासोबत चुकीचा व्यवहार केल्याचा आरोप केला आहे. अभिनेत्रीने असा दावा केला आहे की रणजितने एकदा तिला त्याच्या बेडरूममध्ये बोलावले आणि तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. यामुळे ती खूप घाबरली होती. श्रीलेखा मित्रा यांनी सांगितले होते की, चित्रपट निर्मात्याच्या या कृत्याने ती खूप घाबरली होती आणि बेडरूममधून बाहेर आली. हेमा समितीच्या अहवालात मल्याळम चित्रपटसृष्टीशी संबंधित खळबळजनक खुलासे झाल्यानंतर श्रीलेखाने एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत आपला वाईट अनुभव शेअर केला आहे.
श्रीलेखाने नुकताच इंडियन एक्स्प्रेसला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने सांगितले की, 'दिग्दर्शक रंजितने मला आपल्या बेडरूममध्ये नेले. मी तिथे गेले तेव्हा तो माझ्याशी बोलत होता. त्या दरम्यान त्याने माझ्या बांगड्यांना हात लावला आणि त्याला काहीच माहित नसल्यासारखे नाटक केले. मी या गोष्टीने थोडे अस्वस्थ झाले. पण मला वाईट वाटले हे त्यांना जाणवू न देता आमचे संभाषण चालू ठेवण्याचा प्रयत्न केला. पण मी त्याला प्रतिसाद देत नाही हे पाहून त्याने माझी मान हलवायला सुरुवात केली. इतकंच नाही तर तो माझ्या शरीराला स्पर्शही करू लागला, ते असह्य होते.'
पुढे श्रीलेखा म्हणाली, 'मी त्याची माफी मागितली आणि खोलीतून बाहेर पडले. हे माझ्यासाठी खूप क्लेशदायक होतं. हे मी कुणाशीही शेअर करू शकत नव्हते. या घटनेमुळे मी खूप घाबरले होते. मी हॉटेलमध्ये थांबले आणि रात्रभर विचार करत राहिले की जर १० जण अचानक आले व त्यांनी माझा दरवाजा ठोठावला तर माझे काय होईल? मी फक्त सकाळ कधी होते याची वाट पाहात होते.'
वाचा: मनोज वाजपेयीने विकला मुंबईतील आलिशान फ्लॅट, कोट्यवधी रुपयांचा व्यवहार
चित्रपट निर्माते रणजित यांनी बंगाली अभिनेत्री श्रीलेखाचे सर्व आरोप फेटाळून लावले. ते म्हणाले की, 'ती एकटी त्या फ्लॅटमध्ये नव्हती. त्या फ्लॅटमध्ये तिच्यासोबत दोन सहाय्यक दिग्दर्शक आणि पटकथालेख शंकर रामकृष्णन देखील होते. त्यांच्या उपस्थितीत मी श्रीलेखाला भेटलो. शंकरने श्रीलेखाला चित्रपटाची कथा सांगितली, त्यानंतर ती खूप एक्साइटेड झाली. पण तिला कोणती भूमिका द्यायची याबाबत सर्वजण संभ्रमात होते. नंतर तिला नकार देण्यात आला आणि शंकरला ही गोष्ट श्रीलेखाला सांगण्यास सांगण्यात आले. यामुळे श्रीलेखा प्रचंड संतापली होती.'