मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  चाहत्यांना भेटण्यापूर्वी अमिताभ बच्चन यांनी शिवलिंगावर केला जलाभिषेक! दाखवली घरातील मंदिराची झलक

चाहत्यांना भेटण्यापूर्वी अमिताभ बच्चन यांनी शिवलिंगावर केला जलाभिषेक! दाखवली घरातील मंदिराची झलक

Jun 17, 2024 01:00 PM IST

या फोटोमध्ये बिग बी शिवलिंगाला जल अर्पण करताना दिसले आहेत. यावेळी त्यांनी आपला आवडत्या बीनीसह पिवळा स्वेटशर्ट परिधान केला आहे.

चाहत्यांना भेटण्यापूर्वी अमिताभ बच्चन यांनी शिवलिंगावर केला जलाभिषेक!
चाहत्यांना भेटण्यापूर्वी अमिताभ बच्चन यांनी शिवलिंगावर केला जलाभिषेक!

बॉलिवूडचे महानायक अर्थात अभिनेते अमिताभ बच्चन अनेकदा त्यांच्या ब्लॉगवर त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक गोष्टी शेअर करत असतात. ते नेहमी चाहत्यांसोबत आपल्या घराची झलकही शेअर करतात. ‘बिग बीं’नी त्यांच्या अलीकडच्या ब्लॉगमध्येही असंच काहीसं केलं आहे. त्यांनी त्यांच्या घराच्या मोठ्या बागेत असलेल्या मंदिराचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये बिग बी शिवलिंगाला जल अर्पण करताना दिसले आहेत. यावेळी त्यांनी आपला आवडत्या बीनीसह पिवळा स्वेटशर्ट परिधान केला आहे. जलाभिषेक केल्यानंतर ते देवाला वंदन करताना दिसत आहेत. रविवार असल्याने बिग बींनी त्यांच्या चाहत्यांची भेट घेऊन त्यांनाही अभिवादन केलं. आपल्या घराच्या गेटकडे जाताना अजूनही त्यांना कशी भीती वाटते याबद्दल देखील त्यांनी सांगितले आहे.

काय म्हणाले अमिताभ?

अमिताभ बच्चन यांनी लिहिले, 'एकजण GOJ कडून येण्याची वाट पाहत असतो आणि मनात एक अनामिक भीती असते. तसं तर कसली भीती वाटत नाही, पण मनात एक हुरहूर असते. 'तिथे अजूनही कोणी असेल का..'? असा प्रश्नही येतो. आणि गेट उघडल्याबरोबर हसत-खेळत स्वागत, आणि हवेत असलेले अगणित मोबाईल फोन मला शोधात असतात. ते रस्त्याच्या पलीकडे असलेल्या बाल्कनी आणि इतरांच्या छतावर देखील कब्जा करतात. गोंगाट करणाऱ्या या लाटा आणि हालचाली पाहण्यासारख्या आहेत. माझं लक्ष तिकडे लक्ष वेधून घेतात.’

‘थोडं तुझं आणि थोडं माझं’मधून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येतेय शिवानी सुर्वे; पोस्ट शेअर करत झाली भावूक! म्हणाली...

अभिषेक बच्चनचे केले कौतुक!

अमिताभ बच्चन आपल्या मुलावर प्रेमाचा वर्षाव करण्याची एकही संधी सोडत नाहीत. शनिवारी सकाळी अमिताभ यांनी पुन्हा त्यांच्या ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये विविध गायक अभिषेक बच्चनचे 'दस' चित्रपटातील 'दस बहाने' गाणे गात आहेत. अभिषेकच्या फॅन पेजवरून पोस्ट शेअर करत बिग बींनी लिहिले, 'जगभरात गाजतंय..भैय्यू..तुमच्या प्रयत्नांबद्दल प्रेम आणि खूप कौतुक..आणि आणखी बरेच काही येणार आहे जे आधीच रांगेत आहे.'

ट्रेंडिंग न्यूज

नव्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त

अभिताभ बच्चन सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ते सध्या अनेक नव्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहेत. दरम्यान, अमिताभ 'वेट्टैयान'च्या शूटिंगमध्ये अधिक व्यस्त आहेत, ज्यात रजनीकांत देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. 'कल्की २८९८एडी'मध्ये बिग बी, प्रभास, दीपिका पदुकोण आणि कमल हासनसोबत दिसणार आहेत.

WhatsApp channel
विभाग