बॉबी देओल आधी 'या' अभिनेत्रीने डोक्यावर दारुचा ग्लास ठेवून केला 'जमाल कडू' डान्स, वर्षांनी व्हिडीओ व्हायरल
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  बॉबी देओल आधी 'या' अभिनेत्रीने डोक्यावर दारुचा ग्लास ठेवून केला 'जमाल कडू' डान्स, वर्षांनी व्हिडीओ व्हायरल

बॉबी देओल आधी 'या' अभिनेत्रीने डोक्यावर दारुचा ग्लास ठेवून केला 'जमाल कडू' डान्स, वर्षांनी व्हिडीओ व्हायरल

Aarti Vilas Borade HT Marathi
May 06, 2024 11:04 AM IST

अॅनिमल चित्रपटातील अभिनेता बॉबी देओलचे 'जमाल कडू' हे गाणे तुफान हिट ठरले होते. या गाण्याची हुक स्टेप चर्चेत आहे. पण बॉबी देओल आधी एका अभिनेत्री ही स्टेप केली होती.

बॉबी देओल आधी 'या' अभिनेत्रीने डोक्यावर दारुचा ग्लास ठेवून केला 'जमाल कडू' डान्स, वर्षांनी व्हिडीओ व्हायरल
बॉबी देओल आधी 'या' अभिनेत्रीने डोक्यावर दारुचा ग्लास ठेवून केला 'जमाल कडू' डान्स, वर्षांनी व्हिडीओ व्हायरल

दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांचा 'अॅनिमल' हा चित्रपट तुफान हिट ठरला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली होती. या चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर, बॉबी देओल, अनिल कपूर, रश्मिका मंदाना यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटाचा पुढचा भाग 'अॅनिमल पार्क' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातील 'जमाल कडू' हे गाणे तुफान हिट ठरले होते. तसेच या गाण्याची हूक स्टेपदेखील. पण तुम्हाला माहिती आहे की बॉबी देओल आधी एका अभिनेत्रीने ही स्टेप केली होती.

बॉबी देओलने काही दिवसांपासून सर्वांची मने जिंकली आहेत. अभिनयासोबतच त्याचे 'जमाल कडू' हे गाणे तुफान हिट ठरले होते. या गाण्यावरील त्याची हूक स्टेप अनेकांच्या मनावर राज्य करताना दिसत होती. या गाण्यात बॉबीने दारुचा ग्लास डोक्यावर ठेवला होता. त्याचा तोल राखत त्याने डान्स केला होता. ही हूक स्टेप जवळपास जगभरात प्रसिद्ध झाली. अनेकांनी ही हूक स्टेप करत व्हिडीओ शेअर केले.
वाचा: 'हिच्या पेक्षा तर उर्फी बरी...', करण कुंद्राची गर्लफ्रेंड तेजस्वी प्रकाश कपड्यांमुळे झाली ट्रोल

बॉबी देओल आधी एका अभिनेत्रीने केली होती ही हूक स्टेप

जमाल कडू गाण्याची हूक स्टेप ही अनेक पार्ट्य, लग्न, अवॉर्ड शोमध्ये कलाकार करताना दिसतात. मात्र, यापूर्वी सर्वात पहिले ७० ते ८०च्या दशकात एका अभिनेत्रीने ही हूक स्टेप केली होती. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून रेखा आहे. रेखाने ३५ वर्षांपूर्वी 'बीवी हो तो ऐसी' या चित्रपटातील एका गाण्यात डान्स केला होता. या गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये बॉबी देओल प्रमाणे रेखा डोक्यावर ग्लास ठेवून नाचताना दिसत आहे.
वाचा: ‘द कपिल शर्मा शो’ दोन महिन्यातच होणार बंद? अर्चना पूरण सिंहने चाहत्यांना दिला झटका

कोणत्या गाण्यावर रेखाने केला डान्स?

'बीवी हो तो ऐसी' हा चित्रपट १९८८मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात रेखाने 'सासू जी तूने मेरी कदर न जानी' गाण्यावर डान्स केला होता. या व्हिडीओमध्ये रेखा सलवार सूट परिधान करुन डान्स करत आहे. या चित्रपटात सलमान खान, कादर खान, फारुख शेख, असरानी आणि बिंदू हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत.
वाचा: 'मुन्नाभाई एमबीबीएस' सिनेमासाठी शाहरुख खान होता पहिली पसंती, का दिला नकार जाणून घ्या

Whats_app_banner