बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार सध्या त्याच्या आगामी 'भूत बांगला' चित्रपटामुळे चर्चेत आहे. अलीकडेच अक्षयने मोशन पोस्टरसह 'भूत बांगला'ची घोषणा केली आहे. या चित्रपटाद्वारे अक्षय प्रदीर्घ काळानंतर हॉरर-कॉमेडी प्रकारात परतत आहे. आज आम्ही तुम्हाला अक्षयच्या अशाच हॉरर-कॉमेडी चित्रपटांबद्दल सांगणार आहोत…
अक्षय कुमारचा ‘संघर्ष’ हा चित्रपट १९९९ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अक्षयसोबत प्रिती झिंटा आणि आशुतोष राणा मुख्य भूमिकेत होते. या थ्रिलर चित्रपटातील आशुतोषची भूमिका पाहून सर्वांनी कौतुक केले होते. संघर्षचे दिग्दर्शन तनुजा चंद्रा यांनी केले होते.
जानी दुश्मन हा मल्टीस्टारर चित्रपट होता. हा चित्रपट इच्छा पूर्ण करणाऱ्या नागावर आधारित होता. अक्षय सोबतच यात सोनू निगम, सुनील शेट्टी, अरमान कोहली आणि सनी देओल सारखे प्रमुख कलाकार देखील होते.
अक्षय कुमारचा 'भूल भुलैया' हा चित्रपट 2007 साली प्रदर्शित झाला होता. हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट होता. अक्षय व्यतिरिक्त शायनी आहुजा, विद्या बालन, अमिषा पटेल आणि परेश रावल हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. विद्याने या चित्रपटात भूताची भूमिका साकारली आहे.
अक्षयचा २०२० साली प्रदर्शित झालेला 'लक्ष्मी' हा आणखी एक हॉरर-कॉमेडी चित्रपट होता. या चित्रपटातील अभिनेत्याच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले.
१५ ऑगस्ट रोजी रिलीज झालेल्या अमर कौशिकच्या स्त्री 2 मध्ये अक्षयने कॅमिओ केला आहे. चित्रपटात त्याला कमी वेळ मिळाला असला तरी त्याने आपल्या अभिनयाने सर्वांना प्रभावित केले.