मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Cutt Putali: 'कटपुतली' आधी सीरियल किलिंगवर आधारलेले 'हे' चित्रपट पाहा; घाबरून फुटेल घाम

Cutt Putali: 'कटपुतली' आधी सीरियल किलिंगवर आधारलेले 'हे' चित्रपट पाहा; घाबरून फुटेल घाम

Payal Shekhar Naik HT Marathi
Aug 24, 2022 01:35 PM IST

Cutt Putali Release Date: 'कट पुतली' या चित्रपटाच्या रिलीजसाठी सध्या काही वेळ आहे पण तोपर्यंत तुम्ही OTT वर या रोमांचक सीरियल किलर चित्रपटांचा आनंद घेऊ शकता.

कट पुतली
कट पुतली

serial killer movies: अक्षय कुमारचा पुढील चित्रपट 'कट पुतली' २ सप्टेंबर रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्नी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होत आहे. चित्रपटाची कथा एका सीरियल किलरला पकडण्याची आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यास अजून काही काळ आहे परंतु तोपर्यंत तुम्ही ओटीटीवर या रोमांचक सीरियल किलर चित्रपटांचा आनंद घेऊ शकता.

एक व्हिलन

एक व्हिलन

सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि श्रद्धा कपूर स्टारर 'एक व्हिलन' ही एक अतिशय सुंदर प्रेमकथा आहे, परंतु, श्रद्धाला एक सीरियल किलर ठार मारतो आणि कथेची सुरुवात होते. हा चित्रपट डिस्नी प्लस हॉटस्टारवर उपलब्ध आहे.

मर्डर २

मर्डर २

'मर्डर २' या चित्रपटात धीरज पांडेने एका भयानक सायको किलरची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील धीरजची व्यक्तिरेखा प्रेक्षकांना घाबरवण्यात यशस्वी ठरली. हा चित्रपट यूट्यूब वर पाहता येईल.

संघर्ष

संघर्ष

'संघर्ष' या चित्रपटात आशुतोष राणाने प्रेक्षकांना खूप घाबरवलं होतं. या चित्रपटातील त्याची व्यक्तिरेखा एका खुन्याची होती जो स्वतःला धार्मिक समजतो आणि निष्पाप मुलांचे अपहरण करतो आणि देवीसमोर त्यांचा बळी देतो.

कौन

कौन

'कौन' चित्रपटात उर्मिला मातोंडकरला सीरियल किलर म्हणून दाखवण्यात आले आहे. हा चित्रपट एक सस्पेन्स थ्रिलर आहे. चित्रपट तुम्हाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत खिळवून ठेवतो.

रमन राघव २.०

रमन राघव २.०

'रमन राघव २.०' या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकीने सायको किलरची भूमिका साकारली आहे. चित्रपटातील त्यांचे संवाद आणि शैली आजही लोकप्रिय आहेत. हा चित्रपट अमेझॉन प्राइम आणि झी ५ वर उपलब्ध आहे.

दुष्मन

दुष्मन

संजय दत्त आणि आशुतोष राणा स्टारर 'दुष्मन' मध्ये आशुतोष हा मनोरुग्ण म्हणून दाखवण्यात आला आहे जो मुलींवर बलात्कार करतो आणि त्यांची हत्या करतो. तो सोनिया सहगलला इतक्या क्रूरपणे मारतो की सीन पाहून तुम्ही थक्क व्हाल.

IPL_Entry_Point

विभाग