Bigg Boss Marathi: घरात नवा राडा, पॅडी आणि सूरजमध्ये वादाची ठिणगी, नेमकं काय घडलं?-bb marathi suraj and paddy fight during captaincy task in bigg boss marathi house ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Bigg Boss Marathi: घरात नवा राडा, पॅडी आणि सूरजमध्ये वादाची ठिणगी, नेमकं काय घडलं?

Bigg Boss Marathi: घरात नवा राडा, पॅडी आणि सूरजमध्ये वादाची ठिणगी, नेमकं काय घडलं?

Sep 20, 2024 01:26 PM IST

Bigg Boss Marathi Update: बिग बॉस या स्पर्धकांना नवनवीन टास्कसुद्धा देत आहेत. या टास्क दरम्यान स्पर्धकांमध्ये चांगलाच राडा होत आहे. सतत एकमेकांचे वादविवाद होताना दिसत आहेत.

Bigg Boss Marathi Update
Bigg Boss Marathi Update (insta)

Bigg Boss Marathi Fight: 'बिग बॉस मराठी'ने प्रेक्षकांना अगदी खिळवून ठेवलं आहे. दिवसेंदिवस हा शो अधिकाधिक रंजक बनत आहे. प्रत्येक एपिसोडमध्ये नवनवीन ट्विस्ट अँड टर्न्स पाहायला मिळत आहेत. बिग बॉस या स्पर्धकांना नवनवीन टास्कसुद्धा देत आहेत. या टास्क दरम्यान स्पर्धकांमध्ये चांगलाच राडा होत आहे. सतत एकमेकांचे वादविवाद होताना दिसत आहेत. नुकतंच वर्षा उसगांवकर आणि पॅडी यांच्यात कडाक्याचं भांडण झालं होतं. दरम्यान आता पॅडी आणि सूरजमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. या दोघांमध्ये नेमकं काय घडलं हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

बिग बॉस मराठीच्या आठव्या आठवड्यात कॅप्टन्सी टास्क पार पडणार आहे. या टास्क दरम्यानचे काही प्रोमो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. टास्क दरम्यान पॅडी आणि सूरजमध्ये खटकलं. त्यावरून अंकिता सूरजची समजूत काढताना दिसत आहे. तर दुसरीकडे पॅडी आपण परत कधीच तुला काहीही सांगणार नाही या भाषेत सूरजवर रोष व्यक्त करताना दिसून येत आहे. नेहमीच एकमेकांना स्पोर्ट करणाऱ्या या दोन स्पर्धकांमध्ये नेमकं काय बिनसलं असा प्रश्न सर्वांनाच पडलाय.

कलर्स मराठीने नुकतंच आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये कॅप्टन्सीहोणाऱ्या एका टास्कची रिहर्सल चालू असते. पॅडी काहीतरी सूचना देत असतो. अशातच सूरज मध्ये काहीतरी बोलतो. त्यावेळी पॅडी रिहर्सल चालू आहे तुला सांगितलय ना मध्ये बोलू नकोस असं म्हणत सूरजवर मोठ्या आवाजात ओरडतात. त्यावेळी सूरज शांत होतो.

नंतर सूरज आणि अंकिता याबाबतच संवाद साधत असतात, त्यावेळी पॅडी त्यांच्याजवळ येतो आणि सूरजला काहीतरी खायला देण्याचा प्रयत्न करतो. परंतु सूरज ते घ्यायला नकार देतो. त्यावेळी अंकिता सूरजला म्हणते, तू अशी लोकांची किंमत ठेवणार नसशील तर तुझ्यासाठी कोणी कसं उभं राहणार. असं करू तुझ्यासाठी घेऊन आलेत तर ते घे. असं म्हणत अंकिता आपलं मत सूरजला सांगते. तसेच पॅडी सूरजला मगाशी ओरडल्याबाबत सॉरी म्हणत त्याची माफी मागतो. आणि इथून पुढे तू कसाही वागलास तरी मी तुला काहीही बोलणार नाही म्हणत पुन्हा नाराजी व्यक्त करतो.

या दोघांमध्ये झालेला वाद थोडासा नवा आहे. कारण कायम एकमेकांना सांभाळून घेणारे पॅडी सूरज यांना असं भांडताना पाहून प्रेक्षकांनाही वाईट वाटत आहे. दरम्यानकुणी सूरजच्या बाजूने तर कुणी पॅडीच्या बाजूने प्रतिक्रिया देत आहे. या दोघांचा वाद मिटणार कि त्यांच्या मैत्रीच्या नात्यात असाच दुरावा येणार पाहणं रंजक ठरणार आहे.

Whats_app_banner