Bahin Ladki: दोन बहिणींचं प्रेमळ नातं; ‘बहिण लाडकी’तून उलगडली हळव्या नात्यांची सुंदर कथा!-bahin ladki marathi song the story of pure bond between two sisters catching fans attention ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Bahin Ladki: दोन बहिणींचं प्रेमळ नातं; ‘बहिण लाडकी’तून उलगडली हळव्या नात्यांची सुंदर कथा!

Bahin Ladki: दोन बहिणींचं प्रेमळ नातं; ‘बहिण लाडकी’तून उलगडली हळव्या नात्यांची सुंदर कथा!

Feb 01, 2024 02:12 PM IST

Bahin Ladki Marathi Song: ‘बहिण लाडकी’ या गाण्यातून देखील एक हळवी कथा प्रेक्षकांसमोर मांडण्यात आली आहे. दोन बहिणींची ही हळवी गोष्ट आता प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना देखील दिसत आहे.

Bahin Ladki Marathi Song
Bahin Ladki Marathi Song

Bahin Ladki Marathi Song: मराठी मनोरंजन विश्वात सध्या वेगवेगळे प्रयोग होताना दिसत आहे. चित्रपट, मालिका आणि नाटकांनंतर आता गाण्यांमध्ये स्टोरी टेलिंगचा एक नवा प्रयोग केला जात आहे. ‘बहिण लाडकी’ या गाण्यातून देखील एक हळवी कथा प्रेक्षकांसमोर मांडण्यात आली आहे. दोन बहिणींची ही हळवी गोष्ट आता प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना देखील दिसत आहे. ‘बहिण लाडकी’ या नव्या गाण्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. नुकतंच हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

‘बहिण लाडकी’ गाण्यात दोन सख्ख्या बहिणींच्या प्रेमळ नात्याची कथा यात मांडण्यात आली आहे. या गाण्याच्या कथानकात एक लहान बहिण आणि एक मोठी बहिण असते. त्यांना आई वडील नसल्याकारणाने मोठी बहिणचं लहान बहिणीची आईप्रमाणे सांभाळ करते. तिला मायेने वाढवते. जेव्हा मोठ्या बहिणीचं लग्न ठरतं आणि ती जेव्हा सासरी जाते. त्या क्षणी या दोन्हीही बहिणी भावूक होतात. या गाण्यात त्यांचं अतूट प्रेम दाखवलं आहे. आपण आपल्या खऱ्या आयुष्यात नाती कशा पद्धतीने जपतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘बहिण लाडकी’ हे गाणं आहे. ‘लाडकी बहिण’ हे गाणं बघताना प्रत्येकालाच आपल्या बहिणीची आठवण नक्की येईल.

Bigg Boss: ‘बिग बॉसमधून बाहेर पडल्यावर आयुष्य संपवावं वाटत होतं’; प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा!

मराठी म्युझिक अल्बम सृष्टीत आता विविध धाटणीची गाणी आपल्याला ऐकायला मिळत आहेत. ‘मौसम इश्काचा’ या पहिल्याच थ्रीलर गाण्याच्या यशानंतर केपी फिल्म्स आणि ८ स्टुडिओ प्रस्तुत ‘बहिण लाडकी’ हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्याची खासियत म्हणजे हे गाणं दोन बहिणींच्या प्रेमळ नात्याची कथा मांडणार आहे. हे गाणं अभिनेत्री समृद्धी काळे आणि बालकलाकार निहीरा गाढवे या दोघींवर चित्रीत झालं आहे. प्रसिद्ध गायिका लॅरिसा अल्मेडा हिच्या सुमधूर आवाजात हे गाणं रेकॉर्ड झालं आहे. या गाण्याचे दिग्दर्शन आणि संकल्पना किशन पटेल यांनी केली आहे. तर, या गाण्याचे बोल समृद्धी पांडे हिने लिहीले असून, प्रशांत ओहोळ यांनी या गाण्याला संगीत दिले आहे. या गाण्याचे छायाचित्रीकरण प्रदिप कुटे यांनी केले आहे.

‘बहिण लाडकी’ या गाण्याचं संपूर्ण चित्रीकरण पुण्यातील एका खेडेगावात झालं आहे. विशेष म्हणजे हे संपूर्ण गाणं अवघ्या एका दिवसात चित्रीत झालं आहे. ‘लाडकी बहिण’ हे गाणं प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

Whats_app_banner
विभाग