BAFTA Awards 2024 Winner List: मनोरंजन विश्वातील अतिशय प्रतिष्ठित पुरस्कारांमध्ये गणला जाणारा ‘बाफ्टा २०२४’ हा पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला आहे. जगभरातील चाहते आणि कलाकार या पुरस्कार सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत होते. ब्रिटिश अकादमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन आर्ट्स अर्थात ‘बाफ्टा’च्या यंदाच्या पुरस्कार सोहळ्यामध्ये अनेक कलाकारांनी आपला जलवा दाखवला. या पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटांना गौरवण्यात येते. यावेळीचा ‘बाफ्टा अवॉर्ड्स २०२४’ भारतीयांसाठी देखील खास होता. यावेळी हॉलिवूड स्टार्सनीच नाही, तर बी-टाउन ब्युटी दीपिका पदुकोणने देखील ‘बाफ्टा’ पुरस्कार सादर केला आहे. या पुरस्कार सोहळ्यात पुन्हा एकदा ‘ओपनहायमर’ या चित्रपटाची धूम पाहायला मिळाली. या चित्रपटाने अनेक पुरस्कार पटकावले.
सर्वोत्कृष्ट चित्रपट- ओपनहायमर
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- ख्रिस्तोफर नोलन
स्पेशल व्हिज्युअल इफेक्ट्स – पुअर थिंग्स
सहाय्यक अभिनेता- रॉबर्ट डाउनी जूनियर (ओपनहायमर)
सहाय्यक अभिनेत्री- द होल्ड ओव्हर्स (डेव्हाईन जॉय रँडॉल्फ)
सर्वोत्कृष्ट मेकअप आणि केस- पुअर थिंग्स
सर्वोत्कृष्ट पोशाख डिझाइन - पुअर थिंग्स
सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिझाइन- पुअर थिंग्स
सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी- ओपेनहायमर
सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंट्री- २० डेज इन मारियुपोल
सर्वोत्कृष्ट ब्रिटिश चित्रपट - द झोन ऑफ इंटरेस्ट
सर्वोत्कृष्ट पदार्पण ब्रिटिश लेखक, दिग्दर्शक किंवा निर्माता - अर्थ ममा
ओरिजिनल स्कोअर- ओपनहायमर
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- एम्मा स्टोन (पुअर थिंग्स)
सर्वोत्कृष्ट अभिनेता- सिलियन मर्फी
सर्वोत्कृष्ट संपादन- ओपनहायमर
‘BAFTA पुरस्कार २०२४’ हा पुरस्कार सोहळा भारतीय वेळेनुसार १९ फेब्रुवारी रोजी रात्री १२.३० वाजता आयोजित करण्यात आला होता. यंदाच्या या प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण भारतीय अभिनेत्री आणि पुरस्कार सादरकर्ती म्हणून सामील झाली होती. या पुरस्कार सोहळ्यात दीपिकाने प्रचंड वाहवा मिळवली. चाहते अभिनेत्रीच्या लूकचे खूप कौतुक करत आहेत. या कार्यक्रमातील दीपिकाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
दीपिका पदुकोणने या पुरस्कार सोहळ्यातील तिचा लूक इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. तिच्या या लूकवर यूजर्स खूप प्रेमाचा वर्षाव करत आहेत. अएक कमेंट्स करून यूजर्स आता अभिनेत्रीचे कौतुक करत आहेत. त्याच वेळी, दीपिका तिच्या ‘फायटर’ या चित्रपटामुळे देखील चर्चेत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली पकड ठेवली. तर, प्रेक्षकांना देखील हा चित्रपट खूप आवडला. या चित्रपटात दीपिका पदुकोणसोबत अनेक मोठे स्टार्स होते.