मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर ‘बड़े मियाँ छोटे मियाँ’चा दबदबा; ‘मैदान’ला मिळाला धोबीपछाड! पाहा कलेक्शन...

पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर ‘बड़े मियाँ छोटे मियाँ’चा दबदबा; ‘मैदान’ला मिळाला धोबीपछाड! पाहा कलेक्शन...

Harshada Bhirvandekar HT Marathi
Apr 12, 2024 07:55 AM IST

‘बड़े मियाँ छोटे मियाँ’ आणि ‘मैदान’ असे दोन बिग बजेट आणि चर्चित कलाकारांचे चित्रपट एकाच दिवशी रिलीज झाल्याने चाहते देखील आतुर झाले होते.

पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर ‘बड़े मियाँ छोटे मियाँ’चा दबदबा; ‘मैदान’ला मिळाला धोबीपछाड! पाहा कलेक्शन...
पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर ‘बड़े मियाँ छोटे मियाँ’चा दबदबा; ‘मैदान’ला मिळाला धोबीपछाड! पाहा कलेक्शन...

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेता टायगर श्रॉफ यांचा चित्रपट 'बडे मियाँ छोटे मियाँ' आणि अजय देवगणचा 'मैदान' हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज झाले आहेत. गेल्या कित्येक दिवसांपासून या चित्रपटांची जोरदार चर्चा सुरू होती. दोन बिग बजेट आणि चर्चित कलाकारांचे चित्रपट एकाच दिवशी रिलीज झाल्याने चाहते देखील आतुर झाले होते. अशा परिस्थितीत दोन्हीपैकी कोणत्या चित्रपटाने किती कमाई केली, हे जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटांचे कलेक्शन किती झाले ते बघूया..

ट्रेंडिंग न्यूज

बॉक्स ऑफिसवर कोण गाजवतंय वर्चस्व?

सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, 'बडे मियाँ छोटे मियाँ' चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी १४.६ कोटींची कमाई केली आहे. तर, अजय देवगण याच्या 'मैदान' चित्रपटाने ३.५५ कोटींची कमाई केली आहे. मात्र, हे दोन्ही चित्रपटांचे प्रारंभिक आणि अंदाजे आकडे आहेत आणि त्यात बदल होऊ शकतात. दोन्ही चित्रपटांच्या कमाईवर नजर टाकली, तर अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफच्या चित्रपटाने पहिल्या दिवशी चांगली कमाई केली आहे. परंतु, अजय देवगणच्या ‘मैदान’ या चित्रपटासाठी पैसे कमावणे तसे सोपे दिसत नाही.

अखेर तो क्षण आलाच! सायली-अर्जुन मनातल्या भावना बोलून टाकणार! ‘ठरलं तर मग’मध्ये रोमँटिक वळण

'बडे मियाँ छोटे मियाँ'

अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांच्या 'बडे मियाँ छोटे मियाँ' या चित्रपटाबद्दल सांगायचे तर, हा एक ॲक्शन चित्रपट आहे. या चित्रपटाच्या कथानकात असे दाखवण्यात आले आहे की, देश एका मोठ्या संकटात सापडतो आणि त्याला सामोरे जाण्यासाठी आणि लढण्यासाठी अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ आपली ॲक्शन दाखवायला येतात. अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ ही ॲक्शन जोडी प्रेक्षकांना आवडली आहे. या चित्रपटात भरपूर ॲक्शन आणि धमाल पाहायला मिळत आहे. या चित्रपटाच्या पोस्टर आणि टीझर रिलीजनंतरच मोठा हाईप निर्माण झाला होता. अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांनी जोरदार प्रमोशन देखील केले होते.

‘मी धर्माने आणि संस्काराने मराठी!’; अभिनेत्री अमृता खानविलकर का संतापली? पोस्ट लिहित म्हणाली...

मैदान

अजय देवगणच्या 'मैदान' चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, हा एक स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट आहे. या चित्रपटात सय्यद अब्दुल रहीम यांची कथा अगदी जवळून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र, आता अजयच्या चित्रपटासमोर पैसे कमावण्याचे मोठे आव्हान आहे. चित्रपटाची पहिल्या दिवसाची कमाई पाहता या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर टिकून राहण्यासाठी हातपाय मारावे लागणार आहेत. मात्र, आता या दोनपैकी कोणता चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यात यशस्वी ठरतो हे येणारा काळच सांगेल.

IPL_Entry_Point