'बडे मियाँ छोटे मियाँ'च्या निर्मात्यांनी दिग्दर्शक अली अब्बास जफर विरोधात केली तक्रार, काय आहे प्रकरण वाचा-bade miyan chote miyan producer filed complaint against director ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  'बडे मियाँ छोटे मियाँ'च्या निर्मात्यांनी दिग्दर्शक अली अब्बास जफर विरोधात केली तक्रार, काय आहे प्रकरण वाचा

'बडे मियाँ छोटे मियाँ'च्या निर्मात्यांनी दिग्दर्शक अली अब्बास जफर विरोधात केली तक्रार, काय आहे प्रकरण वाचा

Aarti Vilas Borade HT Marathi
Sep 24, 2024 07:56 AM IST

'बडे मियाँ छोटे मियाँ' चित्रपटाच्या निर्मात्यांनी दिग्दर्शक अली अब्बास जफरवर फसवणूकीचा आरोप केला आहे. त्यांनी या विरोधात पोलिसात तक्रार केली आहे.

Bade miyan chote miyan
Bade miyan chote miyan

पूजा एंटरटेनमेंटचे वाशु भगनानी आणि जॅकी भगनानी यांनी 'बडे मियां छोटे मियाँ'चे दिग्दर्शक अली अब्बास जफर यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. अली अब्बास जफर यांनी 'बडे मियां छोटे मियाँ'च्या चित्रीकरणादरम्यान गैरव्यवहार केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. वाशू आणि जॅकी यांचे म्हणणे आहे की अली अब्बास जफरने अबू धाबी अधिकाऱ्यांकडून घेतलेल्या सबसिडीचा गैरवापर केला आहे. अशा परिस्थितीत वांद्रे पोलीस (मुंबई) लवकरच अली अब्बास जफरला या प्रकरणाच्या तपासाचा भाग म्हणून समन्स बजावू शकतात.

काय आहेत आरोप?

अक्षय कुमारच्या 'बडे मियाँ छोटे मियाँ' या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगलाच फटका बसला होता. ३५० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जेमतेम १०० कोटींची कमाई केली. त्यामुळे निर्मात्यांचे मोठे नुकसान झाले. चित्रपटाचे दिग्दर्शक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी चित्रपटाचे बजेट फुगवणे, लाच स्वीकारणे, चालान बनविणे आणि अबू धाबीच्या शेल कंपनीच्या माध्यमातून पैसे उकळल्याचा आरोप निर्मात्यांनी आपल्या तक्रारीत केला आहे.

जॅकी आणि वाशूच्या आधी अली अब्बास जफरने त्याच्यावर ७.३० कोटी रुपयांची फी न भरल्याचा आरोप केला होता. दैनिक भास्करने दिलेल्या वृत्तानुसार, अली अब्बास जफर यांनी डायरेक्टर्स असोसिएशनकडे अधिकृत तक्रार दाखल करून हस्तक्षेप करण्याची विनंती केली होती, त्यानंतर फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडियन सिने एम्प्लॉईजने (एफडब्ल्यूआयसीई) जॅकी आणि वासू यांना थकबाकी न भरल्याबद्दल विचारणा केली होती. आता जॅकी आणि वाशू यांनी अली अब्बास जफर विरोधात थेट पोलिसाच तक्रार केली आहे.
वाचा: २९ चित्रपटांना मागे टाकत ऑस्कर नॉमिनेशमध्ये जागा मिळवणाऱ्या 'लापता लेडीज' सिनेमाची कथा आहे तरी काय?

'बडे मियाँ छोटे मियाँ' चित्रपटाविषयी

'बडे मियाँ छोटे मियाँ' या चित्रपटात अक्षय कुमार आणि जॅकी श्रॉफ हे दोन बडे स्टार महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. या चित्रपटाची हटके कथा सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. पण तरीही प्रेक्षकांना थिएटरमध्ये आणण्यास हा चित्रपट अपयशी ठरला.

 

 

Whats_app_banner
विभाग