Bad Newz Movie Review In Marathi: बॉलिवूड अभिनेता विकी कौशल, तृप्ती डिमरी आणि अॅमी विर्क यांचा 'बॅड न्यूज' हा चित्रपट १९ एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. विकी कौशलचा हा चित्रपट वाईट नसला, तरी तो परफेक्ट रोमकॉम चित्रपटही नाही. विकी कौशल, तृप्ती डिमिरी आणि अॅमी विर्क यांचा हा चित्रपट थोडा विचित्र वाटू शकतो. आनंद तिवारी दिग्दर्शित हा चित्रपट तुम्हाला मध्येच हसवेल, पण अनेक ठिकाणी जोक्सही नीटसे कळत नाहीत.
या कथेची सुरुवात एका कॅमिओने होते. यानंतर तुमची ओळख सलोनी बग्गा म्हणजेच तृप्ती डिमरीशी होईल. सलोनी एक शेफ आहे, जिची नजर मेराकी स्टारवर आहे. सलोनी आपल्या आईच्या सांगण्यावरून वेगवेगळ्या लग्नांना हजेरी लावते, जेणेकरून तिला लग्नासाठी चांगला मुलगा मिळू शकेल. यानंतर सलोनीची भेट अखिल चड्ढा उर्फ विकी कौशलशी होते. विकी कौशल पश्चिम दिल्लीच्या मुलाची भूमिका साकारत आहे. अखिल चड्ढा याचे करोल बागमध्ये चाप शॉप आहे.
यानंतर चित्रपटात तुम्हाला सलोनी आणि अखिलचा रोमान्स, लग्नाची पहिली रात्र, पुन्हा रोमान्स आणि नंतर दोघांमधील घटस्फोटाची चर्चा पाहायला मिळते. अखिल आणि तिची स्वप्नं खूप वेगळी आहेत, हे सलोनीच्या लक्षात येतं, म्हणून ती अखिलपासून वेगळी होते. अखिलपासून विभक्त झाल्यानंतर सलोनीची भेट गुरबीर पन्नूशी (अॅमी विर्क) होते. गुरबीर पन्नूची व्यक्तिरेखा शांत आणि लाजाळू आहे. त्याला सलोनी आवडते. दोघांमध्ये असे काही तरी घडते, जे घडू नये.
चित्रपटातील कॉमेडी तेव्हा सुरू होते, जेव्हा सलोनीला ६ महिन्यांनंतर कळते की ती गरोदर आहे. आता बाळाचे वडील अखिल आहेत की, गुरबीर याची सलोनीला कल्पना नाही. त्यानंतर सलोनीला कळते की, तिला जुळी मुले होणार आहेत आणि तिच्या गर्भात अखिल आणि गुरबीर या दोघांची मुले आहेत. या संपूर्ण समस्येला हेटरोपॅटर्नल सुपरफेक्युंडेशन म्हणतात. आता अखिल आणि गुरबीर यांच्यापैकी चांगला बाबा कोण हे सिद्ध करण्यासाठी दोघांची धडपड सुरू होणार आहे.
‘बॅड न्यूज’चा पूर्वार्ध खूप छान आहे, पण उत्तरार्धातील ३० मिनिटे जबरदस्तीने खेचलेली दिसतात. चित्रपटातील संवादांबद्दल बोलायचे झाले, तर ते मजेशीर पद्धतीने लिहिले गेले आहेत. वन लाइनर्स तुम्हाला नक्कीच हसवतील. चित्रपटाची पटकथा चांगली आहे, पण तरीही चित्रपटात काही त्रुटी आहेत.
विकी आणि तृप्ती यांच्यात तितकीशी केमिस्ट्री नाही आणि अखिलच्या लव्हस्टोरीमध्ये देखील फारसा रोमान्स नाही. त्याचबरोबर या दोघांमधील अतिप्रणय सीन्स तुम्हाला भुरळ घालू शकतात. पण, काही ठिकाणी या दोघांची केमिस्ट्री तुम्हाला आवडणार नाही. तृप्ती आणि एमी यांच्यातील मैत्री तुम्हाला आवडू शकते.
विकी कौशल या चित्रपटात स्वॅग दाखवताना दिसला आहे. अनेक ठिकाणी विकी कौशलने एकट्याने हा चित्रपट हाताळला आहे. तर, तृप्ती डिमरी चित्रपटात बहुतांश ठिकाणी चिडचिड करताना दिसली आहे. या चित्रपटातील तृप्तीचा अभिनय तुम्हाला फारसा आवडणार नाही. त्याचबरोबर अॅमी विर्कची कॉमिक टायमिंग प्रेक्षकांना खूश करू शकते.
या चित्रपटात अशा काही गोष्टी आहेत, ज्या चित्रपटात नसत्या, तर कदाचित बरे झाले असते, असे तुम्हाला वाटू शकते. या चित्रपटात तुम्हाला बॉलिवूडच्या इतर चित्रपटांचे संदर्भ नक्कीच पाहायला मिळतील. विकी कौशलचा 'तौबा-तौबा' डान्स हा चित्रपटाचा सर्वोत्कृष्ट भाग आहे.
संबंधित बातम्या