मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  ‘पुष्पा २’च्या चाहत्यांसाठी वाईट बातमी! रिलीजला उशीर होण्याची शक्यता; ‘या’ ३ आव्हानांमुळे अडकला चित्रपट

‘पुष्पा २’च्या चाहत्यांसाठी वाईट बातमी! रिलीजला उशीर होण्याची शक्यता; ‘या’ ३ आव्हानांमुळे अडकला चित्रपट

Jun 13, 2024 08:15 AM IST

'पुष्पा-द रुल'ची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपटाचा टीझर आणि गाणे रिलीज झाले आहे. मात्र, ट्रेलर रिलीज होण्यापूर्वीच चित्रपटाचे पुढे ढकलण्यात आल्याची बातमी समोर आली आहे.

‘पुष्पा २’च्या चाहत्यांसाठी वाईट बातमी! रिलीजला उशीर होण्याची शक्यता
‘पुष्पा २’च्या चाहत्यांसाठी वाईट बातमी! रिलीजला उशीर होण्याची शक्यता

साऊथचा सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जुनचा आगामी चित्रपट 'पुष्पा-द रुल'ची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपटाचा टीझर आणि गाणे रिलीज झाले आहे. मात्र, ट्रेलर रिलीज होण्यापूर्वीच चित्रपटाचे पुढे ढकलण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटाच्या शूटिंग आणि क्रिएटिव्ह लेव्हलवर काही काम बाकी आहे, जे पूर्ण होण्यासाठी टीमला आणखी एक महिना लागणार आहे. इतकेच नाही, तर दिग्दर्शक सुकुमार चित्रपटात केलेल्या व्हीएफएक्स कामावर समाधानी नाहीत, त्यामुळे चित्रपटाचे प्रदर्शन आणखी थोडे पुढे ढकलले जाऊ शकते.

या कारणांमुळे चित्रपट पुढे ढकलला जाऊ शकतो!

चित्रपटाची रिलीजची तारीख १५ ऑगस्ट २०२४ निश्चित करण्यात आली होती. परंतु आता ‘तेलुगु ३६०’ने आपल्या एका अहवालात म्हटले आहे की, शूटिंग शेड्यूलचे काटेकोरपणे पालन करूनही, निर्मात्यांना 'पुष्पा-२' ची रिलीज तारीख पुढे ढकलावी लागू शकते. चित्रपटाचे काही भाग असे आहेत, ज्यांचे चित्रीकरण पुन्हा करावे लागणार आहे. सुकुमार आणि त्यांच्या टीमने काही सीक्वेन्स पुन्हा डिझाइन केले आहेत, ज्यांच्या शूटिंगसाठी वेळ लागेल. याशिवाय व्हीएफएक्सबाबतही दिग्दर्शक असमाधानी असून ही सर्व कामे पूर्ण होण्यासाठी जुलैअखेरपर्यंत वेळ लागणार आहे.

तब्बल ६ महिने कुणालाच ओळखू शकली नव्हती दिशा पाटनी! अभिनेत्रीसोबत घडलेला ‘हा’ किस्सा माहितीय का?

पुष्पा-२ चे रिलीज पुढे ढकलणार का?

मिळालेल्या माहितीनुसार, निर्माते डेडलाइनचे पाळण्याचा प्रयत्न करत आहेत आणि सुकुमार वेळेवर गोष्टी पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. पण, शेड्युल थोडे जरी वर-खाली झाले, तर संतुलन बिघडू शकते. अशा परिस्थितीत, सुरक्षितता म्हणून निर्माते रिलीजची तारीख पुढे ढकलण्याची शक्यता आहे. मात्र, अद्याप सुकुमार आणि प्रॉडक्शन टीमकडून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. निर्माते सुकुमार यांनी जुन्या गोष्टी लक्षात ठेवताना सांगितले की, याआधीही काही गोष्टी दबावाखाली असूनही, पुष्पा-द राइज वेळेवर रिलीज झाला होते.

ट्रेंडिंग न्यूज

'पुष्पा - द राइज'मधून किती कमाई झाली?

मागील भागाच्या तुलनेत निर्मात्यांनी 'पुष्पा-२ द रुल'ची रंगत आणखी वाढवली आहे. चित्रपट तयार करण्यासाठी अंदाजे ५०० कोटी रुपये खर्च आला आहे आणि तो वसूल करण्यासाठी, चित्रपटाने प्रत्येक बाजूने सर्वोत्तम देणे आवश्यक आहे. अशा स्थितीत जोपर्यंत सुकुमारचे पूर्ण समाधान होत नाही, तोपर्यंत हा चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता कमी आहे. अल्लू अर्जुनशिवाय रश्मिका मंदाना, विजय सेतुपती आणि फहाद फासिल या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाच्या पहिल्या भागाने ३७३ कोटींचा गल्ला जमवला होता.

WhatsApp channel