Baby John Review: साऊथच्या चित्रपटाचा रिमेक करण्याचा प्रयत्न फसला? कसा आहे वरुण धवनचा 'बेबी जॉन'? वाचा
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Baby John Review: साऊथच्या चित्रपटाचा रिमेक करण्याचा प्रयत्न फसला? कसा आहे वरुण धवनचा 'बेबी जॉन'? वाचा

Baby John Review: साऊथच्या चित्रपटाचा रिमेक करण्याचा प्रयत्न फसला? कसा आहे वरुण धवनचा 'बेबी जॉन'? वाचा

Dec 25, 2024 10:44 AM IST

Baby John Review In Marathi : अभिनेता वरुण धवन स्टारर चित्रपट 'बेबी जॉन' रिलीज झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ॲटली यांनी केले असून, हा चित्रपट 'थेरी' या तमिळ चित्रपटाचा रिमेक आहे. चला जाणून घेऊया कसा आहे हा चित्रपट...

Baby John Review In Marathi
Baby John Review In Marathi

Baby John Review In Marathi : युट्यूबवर हिंदी डब उपलब्ध असलेल्या चित्रपटाचा रिमेक करणे हे धाडसाचे काम आहे आणि नंतर त्याचा वाईट रिमेक बनवणे, याला आपण कायच म्हणू शकतो... असंच काहीसं 'बेबी जॉन' चित्रपटाच्या बाबतीत झालंय असं म्हणता येईल. हा चित्रपट २०१६ मध्ये आलेल्या तमिळ चित्रपट 'थेरी'चा रिमेक आहे. मात्र, त्याचं हे हिंदी व्हर्जन जरा गडबडलं आहे. यात वरुण जॉन नव्हे,तर बाळासारखा दिसला आहे.

वरुण धवनचा चित्रपटात एक संवाद आहे - 'माझ्यासारखे अनेक लोक आले असतील पण मी पहिल्यांदाच आलो आहे.' खरं तर असं अजिबात नाही, याआधी थलापती विजय या भूमिकेत दिसला असून, त्याने पडद्यावर खळबळ उडवून दिली आहे. पण, हिंदीत सगळा सावळा गोंधळ पाहायला मिळाला आहे.

काय आहे कथानक?

या चित्रपटाच्या कथेत काही बदल करण्यात आलेला नाही. कारण हा मूळ चित्रपट युट्यूबवर आहे आणि संपूर्ण कथा विकिपीडियावर लिहिलेली आहे. वरुण धवन हा डीसीपी आहे, तो एका मोठ्या प्रभावशाली व्यक्तीच्या मुलाचा खून करतो. कारण त्याने एका मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केली होती. मग तो व्यक्ती म्हणजे जॅकी श्रॉफ वरुणच्या पत्नी आणि आईला मारतो. त्याला वाटते की, या हल्ल्यात वरुण आणि त्याची मुलगीही मारली गेली, असे त्याला वाटते. पण, नंतर वरुण पोलिसांची नोकरी सोडून दुसरीकडे कुठेतरी आपल्या मुलीसोबत सामान्य जीवन जगतो. पण, तो व्यक्ती पुन्हा वरुणच्या आयुष्यात परत येतो आणि पुढे काय होते, ही या चित्रपटाची कथा आहे. ही कथा २०१६मध्ये फ्रेश होती. मात्र, आता ती जुनी आणि शिळी वाटत आहे.

कसा आहे चित्रपट?

या चित्रपटाची मूळ चित्रपटाशी तुलना अपरिहार्य आहे. मेकर्सनी असे म्हटले होते की, हे मूळ चित्रपटाचे रुपांतर आहे आणि रिमेक नाही. परंतु, अनेक दृश्ये मूळ चित्रपटाचे हुबेहुब कॉपी आहेत. चित्रपटाची ॲक्शन जुनी वाटते, आता हिंसक चित्रपटांचे पॅरामीटर्स बदलले आहेत. नुकताच मार्को हा मल्याळम चित्रपट प्रदर्शित झाला असून त्यात ॲक्शन वेगळ्या पातळीवर दाखवण्यात आला आहे. ॲक्शन देखील क्लिच दिसते, सलमान आणि वरुणमधील सीनमधील ॲक्शन बनावट वाटते.

Mohammed Rafi : गाणं रेकॉर्ड करताना ढसाढसा रडू लागले होते मोहम्मद रफी! कारण ऐकून तुमच्याही डोळ्यांत येईल पाणी

वरुण विजयच्या तुलनेत कुठेच वरचढ दिसत नाही. प्रत्येक सीन पाहताना मूळ चित्रपटातील दृश्य तुमच्या डोळ्यांसमोर येते. मात्र, तरी हा चित्रपट तुम्हाला मोहित करत नाही. काही ठिकाणी चित्रपट इतका बालिश वाटतो की, हसू येतं. मधेच येणारी वाईट गाणी आधीच चिडलेल्या प्रेक्षकांना आणखी वैताग देतात. एकंदरीत हा चित्रपट पाहिल्यानंतर तुम्हाला असं वाटू शकतं की, मूळचा चित्रपट पाहिला असता, तर बरं झालं असतं.

कसा आहे कलाकारांचा अभिनय?

वरुण धवन चित्रपटातील 'जॉन' पात्राला न्याय देऊ शकला नाही. वरुण चांगला अभिनेता आणि मेहनती अभिनेता आहे. मागील वेब सीरिज 'सिटाडेल हनी बनी'मधील त्याचे काम चांगले होते. पण, त्याला काम करायला लावणारे राज आणि डीकेही होते. मात्र, इथे दिग्दर्शकाला त्याची व्यक्तिरेखा फुलवता आली नाही. हा चित्रपट 'सिंघम', 'सिम्बा' आणि 'सूर्यवंशी' यांच्या मिश्रणासारखा दिसतो. आपली तुलना विजयशी होणार हे त्याला माहीत होते आणि विजयच्या तुलनेत वरुण खूपच फिका दिसत होता.

वामिका गब्बीची डायलॉग डिलिव्हरीच विचित्र वाटते, ती प्रेक्षकांना अजिबात प्रभावित करू शकत नाही. कीर्ती सुरेश तिच्या पात्राला न्याय देते. जॅकी श्रॉफ खलनायक म्हणून कमाल दिसला आहे. वरुणच्या मुलीची भूमिका करणाऱ्या झारा झ्यानाचे काम खूप चांगले आहे.

या चित्रपटाच्या मूळ चित्रपटचे दिग्दर्शन ॲटली यांनीच केले होते. यावेळी कॅलिसच्या हाती धुरा देण्यात आली होती. त्याने असा दावा केला होता की, तो वरुणला अशा अवतारात सादर करेल, जो एक अप्रतिम ॲक्शन अवतार असेल आणि ज्याला प्रेक्षक विसरू शकणार नाहीत. पण, आता प्रेक्षक आणि वरुण दोघांनाही हे पात्र विसरायला आवडेल, असं दिसतंय. हा चित्रपट ॲटली, कॅलिस आणि सुमित अरोरा या तीन लेखकांनी लिहिला आहे.

भयानक संगीत!

संगीता आणि गाण्यांमुळे हा वाईट चित्रपट आणखी कर्कश झाला आहे. अत्यंत वाईट गाणी प्रेक्षकांच्या संयमाची परीक्षा घेतात. एकंदरीत हा चित्रपट निराशाजनक आहे. याऐवजी तुम्ही मूळ चित्रपट युट्यूबवर हिंदीमध्ये बघू शकता.

Whats_app_banner