Baby John Collection Day 1 : अभिनेता वरुण धवनचे चाहते बऱ्याच दिवसांपासून 'बेबी जॉन' या बहुप्रतिक्षित चित्रपटाची वाट पाहत होते. अखेर ख्रिसमसच्या मुहूर्तावर हा चित्रपट २५ डिसेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात सलमान खानने कॅमिओ केला असून, त्याचीही खूप चर्चा झाली. सलमान खानची भूमिका अगदी छोटी असली तरी, तोच या चित्रपटात सगळ्यात जास्त चर्चेत राहिला आहे. मात्र, निर्मात्यांनी या चित्रपटाकडून ज्या अपेक्षा ठेवल्या होत्या, त्या पूर्ण होताना दिसत नाहीत. 'बेबी जॉन'ला त्याच्या पहिल्याच दिवशी 'पुष्पा २'च्या २१ दिवसांच्या कलेक्शनने इतकी जोरदार धडक मारली की, तो फार वर जाऊ शकला नाही. या चित्रपटाने पहिल्या दिवशी किती कलेक्शन केले ते जाणून घेऊया.
वरुण धवन रोमँटिक चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहे, मात्र तो ॲक्शन सीन करण्यातही माहीर आहे. मात्र, 'बेबी जॉन'मधील त्याचे ॲक्शन सीन लोकांना अजिबात पचनी पडलेले नाहीत. नाताळच्या सुट्टीत हा चित्रपट प्रदर्शित झाला, पण तरीही अपेक्षित नफा मिळाला नाही. आता या चित्रपटाचे ओपनिंग डे कलेक्शनही समोर आले आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, या चित्रपटाने एकूण १२.५०कोटींची कमाई केली आहे.
चित्रपट निर्माते ॲटली हे इतके प्रसिद्ध आहेत की, त्यांचे चित्रपट बजेटच्या दुप्पट किंवा तिप्पट कमाई करतात. पण, यावेळी त्याच्या चित्रपटाने केवळ बजेट वसूल केले, तरी पुरे असे वाटू लागले आहे. ॲटलीने स्वतः कपिल शर्माच्या शोमध्ये सांगितले होते की, त्यांचे चित्रपट चांगली कमाई करतात. यावेळी तो स्वतः 'बेबी जॉन'च्या प्रमोशनसाठी शोमध्ये आला होता.
अल्लू अर्जुनचा 'पुष्पा २' चित्रपटगृहात येऊन २१ दिवस झाले आहेत, पण पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 'बेबी जॉन'ला अशा प्रकारे धक्का दिला आहे की, चित्रपटाची कमाई संथ झाली आहे. दुसरीकडे 'पुष्पा २' चित्रपटाची कमाई थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. पहिल्या दिवशी जवळपास १६५ कोटी रुपये कमावणाऱ्या या चित्रपटाचे २१व्या दिवशीचे बॉक्स ऑफिस कलेक्शनही समोर आले आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, चित्रपटाने २१व्या दिवशी १९.७५ कोटींची कमाई केली आहे.
वरुण धवनचा 'बेबी जॉन' हा चित्रपट ॲटलीच्या 'थेरी' या तमिळ चित्रपटाचा रिमेक आहे, हे तुम्हाला माहीत असेल. 'थेरी'ने बॉक्स ऑफिसवर कमाल केली होती. अशा परिस्थितीत निर्मात्यांना वाटले होते की, हा हिंदी चित्रपट देखील काहीतरी अप्रतिम करेल, परंतु आता हाती निराशा आली आहे.
संबंधित बातम्या