दंगल सिनेमाने २००० कोटी कमावले आणि फोगट कुटुंबाला १ कोटी दिले; बबिताने साधला आमिर खानवर निशाणा
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  दंगल सिनेमाने २००० कोटी कमावले आणि फोगट कुटुंबाला १ कोटी दिले; बबिताने साधला आमिर खानवर निशाणा

दंगल सिनेमाने २००० कोटी कमावले आणि फोगट कुटुंबाला १ कोटी दिले; बबिताने साधला आमिर खानवर निशाणा

Aarti Vilas Borade HT Marathi
Published Oct 23, 2024 07:24 PM IST

बबिता फोगटने आमिर खानच्या दंगल चित्रपटाबाबत मोठा खुलासा केला आहे. आपल्या कुटुंबावर बनलेल्या दंगल या चित्रपटाने २००० कोटी रुपयांची कमाई केली होती, पण त्यातून त्याच्या कुटुंबाला फक्त १ कोटी रुपये मिळाले.

Babita Phogat
Babita Phogat

माजी महिला कुस्तीपटू बबिता फोगाटने तिच्या आणि कुटुंबावर बनवलेल्या 'दंगल' चित्रपटाबाबत मोठा दावा केला आहे. या चित्रपटात मुख्य भूमिका सुपरस्टार आमिर खानने साकारली होती. गीता आणि बबिता यांच्या कर्तृत्वाचाही या चित्रपटात उल्लेख आहे. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता आणि सुमारे २००० कोटी रुपये कमावले होते. मात्र तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की २०१६मध्ये रिलीज झालेल्या या सुपरहिट चित्रपटासाठी फोगट कुटुंबाला केवळ एक कोटी रुपये मिळाले होते. याचा खुलासा खुद्द कुस्तीपटू बबिता फोगटने केला आहे.

बबिता फोगटने नुकतीच न्यूज २४ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने सांगितले की, दंगल या चित्रपटाने जगभरात २००० कोटी रुपयांची कमाई केली आणि त्यापैकी केवळ एक कोटी रुपये फोगट कुटुंबाकडे गेले. ते ऐकून अँकर आश्चर्यचकीत झाली. या संभाषणादरम्यान अँकरने दंगलने 2000 कोटी रुपये कमावले आणि त्यापैकी फोगाट कुटुंबाला फक्त एक कोटी रुपये का मिळाले असा प्रश्न विचारला. त्यावर तिने हो तुम्ही जे ऐकताय ते खरे आहे असे म्हटले.

पुढे बबिताला विचारण्यात आले होते की या सगळ्या गोष्टींमुळे ती निराश होते का? त्यावर बबिताने वडील महावीर फोगट यांनी शिकवलेल्या मूल्यांचे प्रतिबिंब उमटवणारे सडेतोड उत्तर दिले. "नाही, पप्पांनी एक गोष्ट सांगितली जी लोकांना आवडते आणि तेही आदर करतील" असे बबिता म्हणाली. हा चित्रपट २३ डिसेंबर २०१६ रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन नितेश तिवारी यांनी केले होते, ज्यात आमिर खानने केवळ महावीर फोगटची मुख्य भूमिका साकारली नव्हती तर ते चित्रपटाचे सहनिर्मातेदेखील होते. महावीर फोगाट यांचा प्रवास आणि त्यांना मुलगा नसल्याने त्यांनी आपल्या मुलींना या खेळात आणले आणि मोठ्या स्पर्धांमध्ये देशासाठी पदके जिंकली, हे यात दाखवण्यात आले होते.
वाचा: त्याने मला बेडरुममध्ये बोलावले अन्...; सोनालीने संजय दत्तसोबतच्या त्या सीनवर केले वक्तव्य

बबिता फोगटची कुस्ती कारकीर्द शानदार राहिली आहे. तिने २०१०च्या राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य पदक आणि २०१४ च्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते. २०१२मध्ये जागतिक कुस्ती स्पर्धेत तिने ब्राँझपदक पटकावले होते. २०१६ च्या रिओ ऑलिंपिक खेळातही तिने भारताचे प्रतिनिधित्व केले होते, पण तिला पदक मिळाले नव्हते. २०१९मध्ये बबिताने व्यावसायिक कुस्तीला अलविदा करत राजकारणात पाऊल ठेवले.

Whats_app_banner