Gharoghari Matichya Chuli: ‘बबड्या’ छोट्या पडद्यावर परतणार; ‘घरोघरी मातीच्या चुली’मध्ये साकारणार भूमिका!
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Gharoghari Matichya Chuli: ‘बबड्या’ छोट्या पडद्यावर परतणार; ‘घरोघरी मातीच्या चुली’मध्ये साकारणार भूमिका!

Gharoghari Matichya Chuli: ‘बबड्या’ छोट्या पडद्यावर परतणार; ‘घरोघरी मातीच्या चुली’मध्ये साकारणार भूमिका!

Feb 22, 2024 04:19 PM IST

Gharoghari Matichya Chuli Ashutosh Patki: ‘घरोघरी मातीच्या चुली’ या नव्या मालिकेच्या प्रोमोने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. याच मालिकेतून आशुतोष प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Gharoghari Matichya Chuli Ashutosh Patki
Gharoghari Matichya Chuli Ashutosh Patki

Gharoghari Matichya Chuli Ashutosh Patki: आपल्या दमदार अभिनयाने ‘अग्गंबाई सासूबाई’ ही मालिका गाजवणारा अभिनेता आशुतोष पत्की पुन्हा एकदा छोटा पडदा गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. आशुतोष पत्की याने ‘बबड्या’ बनून महाराष्ट्रातील प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं होतं. आता पुन्हा एकदा तो नव्या भूमिकेत झळकण्यासाठी सज्ज झाला आहे. नव्या मालिकंच्या गर्दीत आता आणखी एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘घरोघरी मातीच्या चुली’ या नव्या मालिकेच्या प्रोमोने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. याच मालिकेतून आशुतोष प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

येत्या १८ मार्चपासून ‘घरोघरी मातीच्या चुली’ ही नवी कोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नात्यांचं महत्त्व सांगणाऱ्या या मालिकेतून अनेक दिग्गज कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. मालिकेच्या प्रोमोना प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. आता या मालिकेतल्या आणखी एका कलाकाराची ओळख नव्या प्रोमोतून झाली आहे. हा नवा सदस्य म्हणजे ‘सौमित्र रणदिवे’. या मालिकेत सुप्रसिद्ध अभिनेता आशुतोष पत्की ‘सौमित्र’ची भूमिका साकारणार आहे. ‘सौमित्र’ म्हणजेच आशुतोष जवळपास ८ वर्षांनी स्टार प्रवाहसोबत काम करताना दिसणार आहे.

Shiv Thakare-Abdu Rozik: शिव ठाकरे आणि अब्दु रोजिक यांच्यामागे ईडीचा ससेमिरा; नेमकं प्रकरण काय?

सौमित्र खूप वेगळा आहे!

अभिनेता आशुतोष पत्की देखील ‘सौमित्र’ ही भूमिका साकारण्यासाठी फारच उत्सुक आहे. या भूमिकेविषयी सांगताना आशुतोष म्हणाला की, ‘स्टार प्रवाहच्या दुर्वा मालिकेत मी एक छोटी भूमिका साकारली होती. इतक्या वर्षांनंतर पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या नंबर वन वाहिनीसोबत काम करायला मिळतंय याचा आनंद आहे. सौमित्र रणदिवे हा वकील आहे. अतिशय हुशार, महत्वाकांक्षी आणि व्यावहारिक आहे. एकत्र कुटुंब पद्धतीत वाढलेला आणि नात्यांचं महत्त्व जाणणारा असा हा सौमित्र मी याआधी साकारलेल्या व्यक्तिरेखांपेक्षा अतिशय वेगळं असं हे पात्र आहे. मालिकेची टीम उत्तम आहे, त्यामुळे काम करताना धमाल येतेय.’

मालिकेच्या नावात दडलीये गोष्ट!

‘घरोघरी मातीच्या चुली’ या नावातच मालिकेची खरी गोष्ट दडलेली आहे. घर म्हटलं तर छोट्या मोठ्या कुरबुरी या आल्याच. मात्र, घराला खऱ्या अर्थाने घरपण मिळतं ते घरातल्या आपल्या माणसांमुळे... याच आपल्या माणसांची गोष्ट ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सविता प्रभुणे, रेश्मा शिंदे, प्रमोद पवार, उदय नेने, प्रतिक्षा मुणगेकर, भक्ती देसाई, सुनील गोडसे अशी दिग्गज कलाकार मंडळी या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत.

Whats_app_banner