महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दकी यांच्यावर शनिवारी गोळी घालून हत्या करण्यात आली. मुंबईतील वांद्रे पूर्व भागात अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेनंतर सर्वत्र खळबळ उडाली. बाबा सिद्दकी यांचे मनोरंजन विश्वाशी घनिष्ठ संबंध होते. त्यामुळे त्यांच्या निधनानंतर अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत शोक व्यक्त केला. तर काहींनी लिलावती रुग्णालयात जाऊन धाव घेतली.
बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख, शिल्पा शेट्टी तसेच प्रिया दत्त, वीर पहारिया, राज कुंद्रा यांच्यासह अनेकजणांनी आपल्या सोशलमिडियावरूनही शोक व धक्का व्यक्त केलाय.
अभिनेता संजय दत्त यांची बहिण प्रिया दत्तने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दु:ख व्यक्त केले आहे. 'माझ्या वडिलांसाठी, बाबा सिद्दीक हे मुलासारखे होते आणि माझ्यासाठी ते एक भाऊ आणि प्रिय मित्र होते. माझ्या वडिलांच्या राजकीय प्रवासात आणि त्यानंतरही ते त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. जेव्हा मी राजकारणात प्रवेश केला, तेव्हा त्यांनी मला त्यातील चढ-उतारांवर मार्गदर्शन केले आणि त्यांचा अतूट पाठिंबा दिला. त्याचे नुकसान कुटुंबातील सदस्याच्या जाण्यासारखे वाटते. भाभी, झीशान आणि अर्शियासाठी माझ्या हृदयात रक्तस्त्राव होतो. ईश्वर त्यांना हे अपार दु:ख सहन करण्याची शक्ती देवो. त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो' या आशयाची पोस्ट तिने केली आहे.
अभिनेता रितेश देशमुखने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने श्रद्धांजली वाहिली आहे. 'अतिशय धक्कादायक गोष्ट मला कळाली. बाबा सिद्दकी यांची अशा प्रकारे हत्या होईल असा कोणी विचारही केला नव्हता. या कठीण काळाचा सामना करण्यासाठी देव त्यांना ऊर्जा देवो' या आशयची पोस्ट रितेशने केली आहे.
वाचा: दीपिकापेक्षा करीनाने घेतली जास्त फी, वाचा ‘सिंघम अगेन’मधील कलाकारांच्या मानधनाविषयी
बाबा सिद्दकी यांच्या हत्येचे वृत्त कळताच बॉलिवूड अभिनेता संजय दत्त, सलमान आणि शिल्पा शेट्टी सिद्दी कुटुंबाला धीर देण्यासाठी लिलावती रुग्णालयात पोहोचले. झहीर इक्बालचे वडील इक्बाल रतनसी यांच्यासह अनेक सेलिब्रिटी हॉस्पिटलमध्ये पोहोचले होते.