Ayushmann Khurrana: सध्या बॉलिवूड म्हणजेच हिंदी चित्रपटांसोबत प्रादेशिक भाषेतील चित्रपटांचे वर्चस्व पाहायला मिळते. मग ते तमिळ चित्रपट असू देत, तेलुगू चित्रपट असू देत किंवा मग मराठी, गुरजाती कन्नड असू देत. प्रादेशिक चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसतात. अनेक बड्या कलाकारांकडून, निर्मात्यांकडून तसेच दिग्दर्शकांकडून या प्रादेशिक चित्रपटांचे कौतुक होताना दिसते. नुकताच बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुरानाने मराठी चित्रपटांमध्ये काम करण्यावर त्याचे मत मांडले आहे.
आयुषमान खुरानाने नुकताच मुंबई मराठी पत्रकार संघात हजेरी लावली. त्यावेळी त्यांने पत्रकारांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. यावेळी त्याने त्याच्या करिअरमधील अनेक गोष्टींवर प्रकाश टाकला. करिअरच्या सुरुवातीचे चित्रपट ते राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता इथपर्यंतचा त्याचा प्रवास त्याने सांगितला. जवळपास १२ वर्षांच्या प्रवासाविषयी त्याने वक्तव्य केले.
वाचा: रिलीजच्या पहिल्या दिवशीच बॉक्स ऑफिसवर द्यावी लागतेय झुंज! पाहा ‘योद्धा’चे कलेक्शन
आयुषमानने पत्रकांशी संवाद साधताना मुंबई येण्याचा प्रवास सांगितला. "कोणत्याही सिनेमात काम करताना तो सिनेमा हिट होईल, या उद्देशाने मी कधीच काम करीत नाही. जी कथा कधीच पडद्यावर आलेली नाही. प्रेक्षकांसाठी वेगळी आणि नवीनच असेल आणि नवीन काहीतरी करायचे या विचारानेच काम करतो. चंदीगड ही माझी जन्मभूमी असली तरी मुंबई ही माझी कर्मभूमी आहे. सगळेजण स्वप्न घेऊन मुंबईत येतात तसाच मी मुंबईत आलो आणि आता मी मुंबईकर आहे" असे तो म्हणाला.
वाचा: अभिनेत्री तेजश्रीने गुपचूप उरकला साखरपुडा, शेअर केले फोटो
पुढे त्याने राष्ट्रीय पुरस्काराचा उल्लेख करत तो म्हणाला, "राष्ट्रीय पुरस्कार मिळाला ही माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. पुरस्कार मिळावा या उद्देशाने मी सिनेमात कधीच काम करीत नाही. काम केलेलेही नाही. प्रेक्षकांना आवडेल, भावेल अशाच नवनवीन भूमिका साकारण्याचा प्रयत्न मी करत असतो." त्यानंतर त्याने नव्या (मराठी) दिग्दर्शकांचा उल्लेख करत, "नवीन दिग्दर्शकांबरोबर काम करूनच आपण अनेक हिट सिनेमा दिले, नवीन दिग्दर्शकाकडे रिस्क घेण्याची क्षमता असते. मराठी चित्रपटात काम करण्याची तयारी फक्त चित्रपटाची कथा चांगली हवी" असे म्हटले.