मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Ayodhya Ram Mandir: हजारो लोकांच्या गर्दीत अयोध्येच्या रस्त्यांवर चालताना दिसले राम-सीता अन् लक्ष्मण! Video Viral

Ayodhya Ram Mandir: हजारो लोकांच्या गर्दीत अयोध्येच्या रस्त्यांवर चालताना दिसले राम-सीता अन् लक्ष्मण! Video Viral

Harshada Bhirvandekar HT Marathi
Jan 18, 2024 08:30 AM IST

Ayodhya Ram Mandir Viral Video: ‘रामायण’ मालिकेतील राम, सीता आणि लक्ष्मण म्हणजेच अभिनेते अरुण गोविल, सुनील लाहिरी आणि अभिनेत्री दीपिका चिखलिया हे सध्या अयोध्येत पोहोचले आहेत.

Ayodhya Ram Mandir Viral Video
Ayodhya Ram Mandir Viral Video

Ayodhya Ram Mandir Viral Video: प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक रामानंद सागर यांच्या 'रामायण' या गाजलेल्या मालिकेत राम, सीता आणि लक्ष्मण यांच्या भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल, सुनील लाहिरी आणि अभिनेत्री दीपिका चिखलिया हे सध्या अयोध्येत पोहोचले आहेत. अयोध्येत होणाऱ्या रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठापनेला ते हजेरी लावणार आहेत. दरम्यान सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये हे तीन ही दिग्गज कलाकार अयोध्येच्या रस्त्यावर फेर फटका मारताना दिसले आहेत. तर, त्यांच्या मागे असंख्य लोकांचा जमाव आहे, जो रामाचा जयघोष करत चालला आहे. या तिन्ही कलाकारांपासून लोकांना दूर ठेवताना सुरक्षा यंत्रणेची मात्र तारांबळ उडाली आहे.

या व्हिडीओमध्ये अरुण गोविल आणि सुनील लाहिरी यांनी पिवळ्या रंगाचा कुर्ता पायजमा परिधान केला आहे. तर, अभिनेत्री दीपिका चिखलिया लाल रंगाच्या साडीत दिसत आहे. बऱ्याच वर्षांनंतर पुन्हा एकदा या तीन कलाकारांना एकत्र पाहण्याची संधी चाहत्यांना मिळाली आहे. ९०च्या दशकातील 'रामायण' मालिकेचा काळ पुन्हा एकदा परत आल्यासारखं चाहत्यांना वाटत आहे. ‘रामायण’ ही मालिका सुपरहिट झाल्यानंतर यातील कलाकार देखील घराघरांत अगदी देवांप्रमाणे पूजले जात होते. या तिन्ही कलाकारांना एकत्र पाहून ‘राम, लक्ष्मण आणि सीता अयोध्येत परतले’, असे चाहते म्हणत आहेत.

Aadesh Bandekar Birthday: महाराष्ट्राचे लाडके ‘भावोजी’ आदेश बांदेकर यांच्याबद्दल ‘या’ गोष्टी माहितीयत का?

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओवर कमेंट करत एका व्यक्तीने लिहिले की, ‘हे आतापर्यंतचे सर्वात अद्भुत रामायण आहे.’ आणखी एका व्यक्तीने लिहिले की, ‘रामानंद सागरजी यांची सर्वोत्कृष्ट मालिका ‘रामायण’, जी ८०-९०च्या दशकात प्रत्येक व्यक्तीने पाहिली होती. मी मुस्लिम असूनही ती पाहिली होती.’ त्याचप्रमाणे अनेकांनी कमेंट करून या व्हिडीओवर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. २२ जानेवारीला अयोध्येच्या राम मंदिरात भगवान श्रीरामाच्या मूर्तीची स्थापना होणार आहे. त्यासाठी असंख्य लोक अयोध्येत पोहोचले आहेत.

बॉलिवूड, टीव्ही, क्रीडा आणि राजकारणातील काही खास लोकांनाही यावेळी अयोध्येत आमंत्रित करण्यात आले आहे. या ऐतिहासिक दिवसाविषयी बोलताना रामाची भूमिका साकारणारा अभिनेता अरुण गोविल म्हणाले की, ‘राम मंदिर हे आपले राष्ट्रीय मंदिर ठरेल. हे मंदिर गेल्या काही वर्षांत जगभरात लुप्त होऊ लागलेल्या संस्कृतीचा पुन्हा जागर करेल, ज्यामुळे देशाची संस्कृती पुन्हा मजबूत होईल. हा एक वारसा आहे, जो जगभर ओळखला जाईल.’

WhatsApp channel