मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Ayodhya Ram Mandir: अयोध्येत पोहोचले टीव्हीचे ‘श्रीराम’; अभिनेत्याला पाहताच चाहत्यांनी घातला दंडवत!

Ayodhya Ram Mandir: अयोध्येत पोहोचले टीव्हीचे ‘श्रीराम’; अभिनेत्याला पाहताच चाहत्यांनी घातला दंडवत!

Jan 15, 2024 10:14 AM IST

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha: अयोध्येच्या श्रीराम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा मोठ्या जल्लोषात होणार असून, या सोहळ्यासाठी अभिनेते अरुण गोविल यांना देखील निमंत्रण देण्यात आलं होतं.

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha
Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha: देशातच नव्हे तर, अवघ्या जगभरात सध्या भगवान श्रीरामाचा जयघोष ऐकू येत आहे. येत्या २२ तारखेला अयोध्येच्या राम मंदिरात श्री रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा होणार आहे. या सोहळ्यासाठी आता सगळेच जाळूशात तयारी करत आहेत. २२ तारखेला अयोध्येत पार पडणाऱ्या या सोहळ्यात काही खास व्यक्ती आणि दिग्गज कलाकार उपस्थित राहणार आहेत. २२ तारखेच्या या सोहळ्यासाठी काही मोजक्याच लोकांना निमंत्रण देण्यात आले असून, अयोध्येत कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठापनेला टीव्ही विश्वातील ‘श्रीराम’ अर्थात अभिनेते अरुण गोविल देखील हजेरी लावणार आहेत.

अयोध्येच्या श्रीराम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा मोठ्या जल्लोषात होणार असून, या सोहळ्यासाठी अभिनेते अरुण गोविल यांना देखील निमंत्रण देण्यात आलं होतं. या भव्य दिव्य ऐतिहासिक सोहळ्याला हजेरी लावण्यासाठी स्वतः अरुण गोविल अयोध्येला रवाना झाले आहेत. रामानंद सागर यांच्या लोकप्रिय ‘रामायण’ या मालिकेत अभिनेते अरुण गोविल यांनी ‘श्रीरामा’ची भूमिका साकारली होती. या मालिकेमुळे त्यांना प्रेक्षक खऱ्या आयुष्यातही भगवान राम समजू लागले होते. या मालिकेला तब्बल २० वर्षांहून अधिक काळ लोटून गेला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Amitabh Bachchan Surgery: अमिताभ बच्चन यांच्यावर शस्त्रक्रिया; शेअर केलेल्या फोटोंमुळे झाला खुलासा!

आजघडीला अगदी २० वर्षांनंतर देखील रामायण मालिका आणि त्यातील कलाकारांची लोकप्रियता अबाधित आहे. याचाच अनुभव पुन्हा एकदा अरुण गोविल यांना आला आहे. रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठेसाठी अयोध्येला रवाना झालेल्या अरुण गोविल यांना पाहताच चाहत्यांनी विमानतळावरच त्यांच्या पाया पडण्यास सुरुवात केली. खऱ्या आयुष्यात देखील त्यांना आजही चाहते भगवान राम समजत आहेत. स्वतः अरुण गोविल यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी अयोध्या प्रवासाची झलक दाखवली आहे.

अरुण गोविल यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ते विमानातून अयोध्या प्रवास करताना दिसत आहेत. यावेळी त्यांनी चाहत्यांसोबतचे काही खास क्षण देखील शेअर केले. महर्षी वाल्मिकी विमानतळावर उतरताच चाहते अरुण गोविल यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी आले. यावेळी काही चाहत्यांनी थेट अरुण गोविल यांच्या पायांना स्पर्श करून त्यांचा आशीर्वाद घेतला. अरुण गोविल यांचा हा व्हिडीओ पाहून लोकांचं त्यांच्या प्रती असलेलं प्रेम दिसत आहे. तर, प्रभू रामाच्या स्वागतासाठी आता पूर्ण अयोध्या नागरी सजली आहे. सगळेच भक्त आता या खास दिवसाची वाट बघत आहेत.

WhatsApp channel